Video: अंकिता लोखंडेचा हॉट अंदाज, मात्र सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं आता एक व्हिडीओ शेअर केला आहे(Ankita Lokhande's Hot Video getting trolled by Sushants' Fans)

Video: अंकिता लोखंडेचा हॉट अंदाज, मात्र सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल
| Updated on: Dec 16, 2020 | 12:57 PM

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. आता अंकितानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती गायक हनी सिंहच्या ‘फस्ट किस’ या गाण्यावर लिपसिंक करत आहे. मात्र, अंकिताचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला नाही. काहीजणांनी कमेंटमध्ये, ती ओव्हर अ‍ॅक्टिंग करत असल्याचं म्हटलं. तर, काहींनी सुशांतला विसरलीस का?, असा प्रश्न केला. (Ankita’s Hot Video getting trolled by Sushants’ Fans )

एका नेटकऱ्यानं तर सरळ, ‘सुशांतला विसरुन आता मजा करत आहेस’ अशी कमेंट केली. तर, दुसऱ्यानं ‘सुशांतच्या मृत्यूला 6 महिने झाले आणि तू त्याला विसरली’ अशी कमेंट केली. मात्र काही कलाकारांना अंकिताचा हा अंदाज चांगलाच पसंतीस उतरला आहे.

सुशांतला दिली श्रद्धांजली
काही दिवसांपूर्वी अंकितानं ‘झी अवॉर्ड्स’मध्ये सुशांतला स्पेशल श्रद्धांजली दिली होती. तेव्हा तिची मोठ्या प्रमाणात स्तुती करण्यात आली. झी अवॉर्ड्समध्ये अंकितानं सुशांतसाठी एक परफॉर्मंससुद्धा सादर केला होता. सोबतच तिनं सुशांतच्या चाहत्यांना हा परफॉर्मंस पाहण्याचं आवाहनसुद्धा केलं होतं. सध्या गेले काही दिवस अंकिता बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत धमाल करताना दिसतेय. ती सोशल मीडियावर विक्कीसोबत फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं विक्कीसाठी एक पोस्ट लिहिली होती. ज्यात तिने विक्कीकडे माफी मागितली होती.

काय होती ती पोस्ट
‘नेहमी माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या समस्यांसाठी नेहमीच तोडगा काढल्याबद्दल धन्यवाद. मला तुझी माफी मागायची आहे, कारण माझ्यामुळे तुझ्यावरसुद्धा टीका करण्यात आली. जी तू मुळीच डिझर्व्ह करत नाहीस. आय लव्ह यू विकी जैन’, असं कॅप्शन देत तिनं ही पोस्ट शेअर केली होती.

संबंधित बातम्या 

अर्जुन रामपालची पुन्हा NCB चौकशी, अटकेची टांगती तलवार

Photo : भारती सिंहचं जबरदस्त कमबॅक, ‘द कपिल शर्मा शो’साठी सज्ज