ना शब्द, ना लिरिक्स…, फक्त रोमँटिक सीनमुळे सुपरहिट ठरलं हे गाणं, 42 वर्षानंतर लोक आवडीने बघतात

अनुराधा पौडवाल यांनी 42 वर्षांपूर्वी गायले होते शब्दांशिवाय गाणे. 4 मिनिटे 56 सेकंदाचं गाणं तरीही ठरलं प्रचंड सुपरहिट. आजही लोक वेळ काढून ऐकतात.

ना शब्द, ना लिरिक्स…, फक्त रोमँटिक सीनमुळे सुपरहिट ठरलं हे गाणं, 42 वर्षानंतर लोक आवडीने बघतात
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 11, 2026 | 7:16 PM

भजन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील एक गाणे असे आहे, ज्यामध्ये जवळपास शब्दच नाहीत. विशेष म्हणजे, तब्बल 4 मिनिटे 56 सेकंदांचे हे गाणे केवळ आलाप आणि तोंड बंद ठेवून गायले अन् ते लोकप्रिय झाले. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा खोडकर अंदाजही पाहायला मिळाला होता.

अनुराधा पौडवाल यांच्या या अनोख्या गाण्याचा संबंध 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घर एक मंदिर’ या चित्रपटाशी आहे. या चित्रपटात शशी कपूर आणि मौसमी चॅटर्जी मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, राज किरण, रंजीता कौर आणि शोमा आनंद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

Loading...

या चित्रपटातील हे गाणे 4 मिनिटे 56 सेकंदांचे असून त्यामध्ये पारंपरिक गाण्यांप्रमाणे कडवी किंवा मुखडा नाही. संपूर्ण गाण्यात ‘हे हो…’, ‘आना…’, ‘ना ना ना…’ अशा आवाजांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे गाणे वेगळे ठरते.

अनुराधा पौडवाल यांच्यासोबत सुरेश वाडकर यांचाही आवाज

या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनुराधा पौडवाल यांनी हे गाणे एकट्याने गायले नव्हते. त्यांना ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचीही साथ लाभली होती. शशी कपूर यांच्या व्यक्तिरेखेसाठी सुरेश वाडकर यांनी हमिंग केले होते तर मौसमी चॅटर्जी यांच्या व्यक्तिरेखेसाठी अनुराधा पौडवाल यांनी आलाप दिला होता. या गाण्याला संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते, तर आनंद बक्षी यांनी त्याचे मोजके बोल लिहिले होते.

चित्रपटातील हे गाणे शशी कपूर आणि मौसमी चॅटर्जी यांच्या व्यक्तिरेखांवर चित्रित करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना शशी कपूर यांच्या व्यक्तिरेखेतील रोमँटिक आणि खोडकर अंदाज पाहायला मिळतो. जवळच लहान मूल झोपलेले असतानाही ते मौसमी चॅटर्जी यांच्याशी मस्ती करताना दिसतात.

विशेष म्हणजे, कोणतेही मोठे बोल नसतानाही केवळ आवाजातील चढ-उतार, आलाप आणि संगीताच्या माध्यमातून या गाण्यातील रोमँटिक भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us