Anushka Sharma: अनुष्का शर्माचा रिअल इस्टेटमध्ये मोठा डाव; आई-वडिलांसोबत वर्सोव्यात घेतले तब्बल इतक्या कोटींचे दोन फ्लॅट

Anushka Sharma: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे त्यांच्या विविध प्रॉपर्टी खरेदीमुळे चर्चेत आहेत. अनुष्काने नुकतंच तिच्या आईवडिलांसोबत मुंबईतील वर्सोवा इथं दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. त्यांची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल.

Anushka Sharma: अनुष्का शर्माचा रिअल इस्टेटमध्ये मोठा डाव; आई-वडिलांसोबत वर्सोव्यात घेतले तब्बल इतक्या कोटींचे दोन फ्लॅट
Virat Kohli and Anushka Sharma
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2026 | 8:24 AM

Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा तिच्या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटमुळे चर्चेत आली आहे. अनुष्काने आई-वडिलांसोबत मुंबईतील वर्सोवा परिसरात तब्बल 25.80 कोटी रुपयांचे दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहेत. रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सकडून मिळालेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या माहितीनुसार, या दोन्ही व्यवहारांची नोंद 8 जुलै 2026 रोजी करण्यात आली आहे. अनुष्का शर्माने वर्सोव्यातील यारी रोडवर असलेल्या ‘गोदरेज स्कायशोर’ या लक्झरी प्रोजेक्टमध्ये 24व्या मजल्यावर एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या फ्लॅटची किंमत जवळपास 14.89 कोटी रुपये असून त्याचं एकूण क्षेत्रफळ सुमारे 2,153 स्क्वेअर फूट आहे. यामध्ये जवळपास 2,026 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि बाल्कनी-टेरेसचा अतिरिक्त भाग आहे.

या व्यवहारासाठी अनुष्काने सुमारे 74.47 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. फ्लॅटसोबत तीन कव्हर्ड बेसमेंट पार्किंग स्पेसही मिळणार आहेत. विशेष म्हणजे अनुष्काच्या आई-वडिलांनीही याच प्रोजेक्टमध्ये तिच्या फ्लॅटला लागून असलेलं आणखी एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. आशिमा आणि अजय कुमार शर्मा यांनी सुमारे 1,577 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा हा फ्लॅट 10.91 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. या व्यवहारासाठी जवळपास 65.44 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याची माहिती समोर आली आहे. या घरासोबत दोन कव्हर्ड बेसमेंट पार्किंगची सुविधा आहे.

Loading...

दोन्ही फ्लॅट्सची एकत्रित किंमत 25.80 कोटी रुपये असून त्यांचं एकूण क्षेत्रफळ सुमारे 3,731 स्क्वेअर फूट आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही अपार्टमेंट्स सध्या निर्माणाधीन प्रोजेक्टचा भाग असून त्यांचा ताबा 30 जून 2031 पर्यंत किंवा त्यापूर्वी मिळण्याची शक्यता आहे.

अनुष्का-विराटकडे याच प्रोजेक्टमध्ये आणखी फ्लॅट

अनुष्का आणि तिचे कुटुंबीय याच प्रोजेक्टमध्ये आधीपासूनही प्रॉपर्टी खरेदी करत आहेत. जुलै 2026 मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मिळून याच ‘गोदरेज स्कायशोर’ प्रोजेक्टमध्ये सुमारे 18.29 कोटी रुपयांचा आणखी एक फ्लॅट खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनुष्का आणि तिच्या कुटुंबाच्या नावावर याच मजल्यावर असलेल्या तीन अपार्टमेंट्सची एकत्रित व्यवहार किंमत जवळपास 44 कोटी रुपये होते.

दरम्यान, अनुष्का आणि विराट यांची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक याआधीही चर्चेत आली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये दोघांनी अलिबागमधील झिराड गावात सुमारे 37.86 कोटी रुपयांना 5.19 एकर जमीन खरेदी केली होती. याआधी 2022 मध्येही त्यांनी जवळपास आठ एकर जमीन घेतली होती. त्यामुळे अनुष्का-विराटची रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक असल्याचं दिसून येतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us