
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे नेहमीच चर्चेत असतात. 2019 मध्ये अनुष्का शर्मा ही झिरो चित्रपटात दिसली. मात्र, झिरो चित्रपट फ्लाॅप गेला. अनुष्का शर्मा आणि शाहरूख खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते, तरीही हा चित्रपट फ्लाॅप गेला. अनुष्का शर्मा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही अनुष्का शर्मा ही शेअर करताना दिसते. अनुष्का शर्मा ही विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर पोहचले. 2024 मध्ये अनुष्का शर्मा हिने मुलाला जन्म दिला.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याचे चाहत्यांसोबत शेअर केले. हेच नाही तर या पोस्टसोबतच त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाची घोषणा देखील केली. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवले. अनुष्का शर्मा हिने भारतामध्ये नव्हे तर लंडनमध्ये मुलाला जन्म दिलाय.
अनुष्का शर्मा ही डिलीवरीनंतर अजूनही भारतामध्ये दाखल झाली नाहीये. विराट कोहली सध्या प्रॅक्टिससाठी भारतात दाखल झाल्याचे सांगितले जातंय. मात्र, अनुष्का शर्मा ही आपल्या मुलांसोबत अजूनही विदेशातच आहे. अशी एक चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे की, अनुष्का शर्मा ही भारतामध्ये परतणार की नाही? अनुष्का विदेशातच राहणार असल्याचे सांगितले जाते.
डिसेंबर 2023 मध्ये शेवटी अनुष्का शर्मा ही भारतामध्ये दिसली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये यूकेमध्ये आपल्या मुलाला जन्म दिला. एकाने लिहिले की, हळूहळू करून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे यूकेमध्ये शिफ्ट होत आहेत. दुसऱ्याने लिहिले की, अनुष्का पाच महिन्यांपासून लंडनमध्येच आहे.
तिसऱ्याने लिहिले की, विराट कोहली हा आयपीएससाठी भारतामध्ये दाखल झाला आहे, तो आयपीएल संपल्यानंतर परत लंडनमध्ये शिफ्ट होईल. अजून एकाने लिहिले की, वामिका आणि अकाय यांची प्रायवेसी राखण्यासाठी हे विदेशात शिफ्ट होऊ शकतात. आता यावर जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा सध्या बाॅलिवूड चित्रपटांपासूनही दूरच आहे.