AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ब्रेड पकौडे की कसम कभी धोखा नहीं दूंगा..’, अनुष्का शर्मा – विराट कोहली यांच्यामधील खास क्षण, व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या पाच वर्षांनंतर देखील विराट कोहली पत्नी अनु्ष्का शर्मा हिला म्हणतो, 'कधी फसवणूक करणार नाही...', दोघांमधील खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल...

'ब्रेड पकौडे की कसम कभी धोखा नहीं दूंगा..', अनुष्का शर्मा - विराट कोहली यांच्यामधील खास क्षण, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: May 27, 2023 | 4:15 PM
Share

मुंबई : झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध कपल अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनुष्का आणि विराट याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया कायम व्हायरल होत असतात. शिवाय मुलाखतीच्या माध्यमातून देखील विराट आणि अनुष्का त्यांच्या नात्याबद्दल सांगत असतात. आता देखील दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. ज्यामध्ये लग्नाच्या पाच वर्षांनंतर देखील विराट कोहली पत्नी अनु्ष्का शर्मा हिला ‘कधी तुझी फसवणूक करणार नाही…’ असं म्हणताना दिसत आहे.. सध्या सोशल मीडियावर विराट – अनु्ष्का यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे..

विराट आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर ट्रेंड होत आहे. व्हिडीओमधील दोघांचे खास क्षण चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहे. व्हिडिओमध्ये, होस्ट अभिनेत्री अनुष्काला एका डायलॉग बोलायला सांगतो आणि विराटला तो डायलॉग रिपिट करायला सांगतो.. तेव्हा अनुष्का २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘बँड बाजा बारात’ सिनेमातील एक डायलॉग म्हणते..

अनुष्का म्हणते, ‘प्यार व्यापार की जोडी कभी नहीं बैठती, ना भैय्या मैं को सिंगल ही बेस्ट…’ यावेळी अनुष्काचा डायलॉग न बोलता विराट अभिनेता रणवीर सिंग याचा डायलॉग म्हणतो.. विराट म्हणतो, ‘बिजनेस कर ले मेरे साथ, ब्रेड पकौडे की कसम कभी धोखा नहीं दूंगा….’ सध्या विराट आणि अनुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे..

पुढे विराट म्हणाला, ‘माझ्या सगळं लक्षात आहे…’, त्यानंतर हसत म्हणली, ‘मला असं वाटत आहे की, विराट मला प्रपोज करत आहे.. ‘, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘बँड बाजा बारात’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर सिनेमा २०१० साली प्रदर्शित झाला होता.. ‘बँड बाजा बारात’ सिनेमाच्या माध्यमातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं..

‘बँड बाजा बारात’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकल्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. तर अनुष्काने अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.. आज रणवीर आणि अनुष्का यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही.. दोघांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्क केलं आहे..

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ