
मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडचा सामना सुरू आहे. या सामन्यात विराट कोहली याने धडाकेबाज कामगिरी केलीये. विश्वचषक 2023 उपांत्य फेरीचा हा महत्वाचा सामना सुरू आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय. बाॅलिवूड स्टार हे भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहचले आहेत. विराट कोहली याची पत्नी आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील स्टेडियममध्ये उपस्थित आहे. विराटने 50 वे शतक नोंदवले, तेंव्हा भर मैदानात अनुष्का शर्मा ही विराटला फ्लाइंग किस देताना दिसली.
अनुष्का शर्मा हिच्या फ्लाइंग किसचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी काैशल, रणबीर कपूर असे बरेच कलाकार सामना बघण्यासाठी पोहचले आहेत. इतकेच नाही तर या सामन्याकडे सर्वांच्याच नजरा असल्याचे बघायला मिळतंय. चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दलचे एक मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.
विराट कोहली याने आपले 50 वे शतक पूर्ण करताच बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत विराट कोहली याचे काैतुक केले. यासोबत त्यांनी एक अत्यंत खास असा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर स्टेडियममधील व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, असा विराट कोहली याने इतिहास रचला…आणि आम्हा भारतीयांना याचा अभिमान आहे…जय हो! जिंदाबाद…आता अनुपम खेर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
विराट कोहली याने आपले शतक पूर्ण करताच अनुष्का शर्मा ही उभे राहून टाळ्या वाजवताना आणि विराट कोहली याला फ्लाइंग किस देताना दिसली. फक्त अनुष्का शर्मा हिच नाही तर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते देखील उभे राहून टाळ्या वाजवत विराट कोहली याचे काैतुक करताना दिसले. विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्मा हिच्या चेहऱ्यावर मोठा आनंद बघायला मिळाला.