मुसलमान आहे म्हणून अडचणी…, हिंदू आणि मुस्लीम धर्माबद्दल ए.आर. रेहमान यांचं मोठं वक्तव्य

ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांनी हिंदु आणि मुस्लीम धर्माबद्दल नुकताच झालेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. रेहमान म्हणाले, 'मी मुस्लीम आहे आणि रामायण हा हिंदू ग्रंथ...', सध्या सर्वत्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा...

मुसलमान आहे म्हणून अडचणी..., हिंदू आणि मुस्लीम धर्माबद्दल ए.आर. रेहमान यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Jan 17, 2026 | 8:47 AM

ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ते कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ए. आर. रेहमान यांनी किरयर आणि धार्मिक विश्वासाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, रेहमान यांनी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमात केलेल्या कामाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालेलं आहे. याच कारणांमुळे इंडस्ट्रीमध्ये राजनिती होते.. असं देखील ए. आर. रेहमान म्हणाले आहेत.

‘रामायण’ सिनेमावर काय म्हणाले रेहमान?

‘रामायण’ सिनेमावरील अल्बम तयार करण्यात त्यांच्या धार्मिक श्रद्धेची भूमिका होती का, असं रेहमान यांना मुलाखतीत विचारण्याच आलं. यावर रेहमान म्हणाले, ‘मी ब्राह्मण शाळेत शिक्षण घेतलं आहे. प्रत्येक वर्षी रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या आहेत. लोकं वाद घालू शकतात. पण मी फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींना महत्त्व देतो… त्या कोणी शिकल्या आहेत.. याला जास्त महत्त्व नसतं…’

 

 

रेहमान पुढे म्हणाला, ‘पैगंबर यांनी सांगितलं होतं की, ज्ञान अनमोल आहे, मग ते राजाकडून मिळालं असेल किंवा भिकाऱ्याकडून… चांगल्या गोष्टींमधून किंवा वाईट गोष्टींमधून… कधी कोणत्या प्रसंगातून पळवाट काढू नये. आपण लहान विचारसरणी आणि स्वार्थाच्या पलीकडे जायला हवं. जेव्हा आपण उंचावर जातो तेव्हा आपण चमकतो, आपण प्रकाशतो आणि तेच महत्त्वाचं आहे. मला संपूर्ण प्रकल्पाचा अभिमान आहे, मी मुस्लीम आहे आणि रामायण हा हिंदू ग्रंथ आहे.’ असं देखील ए. आर. रेहमान म्हणाले.

‘रामायम’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर रवी दुबे, सनी देओल, काजल अग्रवाल, अरुण गोविल आणि इंदिरा कृष्णन यांनी देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.