ए. आर. रेहमान यांच्या मुलाचा गंभीर अपघात, टॅक्सीला लग्जरी कारची धडक, प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून मोठी अपडेट
ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांचा मुलगा अमीन याला अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी अमीन याचा गंभीर अपघात झाल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चेन्नईमध्ये एका मित्रासोबत आलिशान कारमधून प्रवास करत असताना, त्यांची कार एका रॅपिडो टॅक्सीला धडकली.

ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांचा मुलगा अमीन याचा सोमवारी सकाळी गंभीर अपघात झाला. समोर येत असलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये एका मित्रासोबत आलिशान कारमधून प्रवास करत असताना, त्यांची कार एका रॅपिडो टॅक्सीला धडकली. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने, चेन्नईमध्ये गिंडीच्या दिशेने जात असताना अमीनची पोर्शे कार ‘रॅपिडो’ वॅगन-आर कारला धडकली. या अपघातात त्याला किरकोळ दुखापत झाली. समोर येत असलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास गिंडी येथील ऑलिम्पिया टेक पार्क सिग्नलजवळ घडला. अमीन त्याचा मित्र भार्गवसोबत गिंडीला जात होता.
या अपघातात अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अपघातात वॅगन-आर कार चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही कार जप्त केल्या असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमीन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याला कायम त्याचा वडिलांसोबत स्पॉट केलं जातं. 2022 मध्ये त्याने BTS सोबत काही फोटो पोस्ट केलेले. ते फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
काय करतो ए. आर. रेहमानचा मुलगा?
एआर अमीन हा एआर रहमान आणि सायरा बानो यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 6 जानेवारी 2003 मध्ये झाला. त्याने देखील वडिलांच्या पाऊलावर पाव ठेवत गाण्यास सुरुवात केली. त्याने तिने 2015मध्ये मणी रत्नम यांच्या ‘ओ कधल कनमनी’ या सिनेमातील ‘मौला वा सल्लीम’ या गाण्याद्वारे बालगायिका म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘2.0’ सारख्या प्रोजेक्टमध्ये स्वतंत्र गाण्यांवर काम केले. 2019 मध्ये ‘सागो’ या गाण्याद्वारे त्याने संगीत निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं.