Archana Puran Singh: अर्चना पुरण सिंगचा 35 वर्षांचा संसार मोडणार? व्हिडिओची जोरदार चर्चा

Archana Puran Singh Divorced: बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पुरण सिंग आणि पती परमीत शेठी यांचा ३५ वर्षांचा संसार मोडणार आहे. व्हायरल व्हिडिओमुळे आता चर्चेला उधाण आले आहे.

Archana Puran Singh: अर्चना पुरण सिंगचा 35 वर्षांचा संसार मोडणार? व्हिडिओची जोरदार चर्चा
| Updated on: Oct 05, 2026 | 3:39 PM

कलर्सच्या ‘पती पत्नी और पंगा’ या शोचा दुसरा सीझन दणक्यात सुरू होणार आहे. या शोमध्ये खऱ्या आयुष्यातील जोडपी जोरदार वाद घालताना दिसतील. जोडप्यांवर आधारित हा शो १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. यावेळी अर्चना पुरण सिंग आणि परमीत सेठी हे स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. पण या शोमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात अर्चनी तिचा ३५ वर्षांचा संसार मोडण्याबद्दल बोलत आहे.

शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये मुनव्वर त्या दोघांमध्ये वाद निर्माण करतो. प्रकरण इतके वाढते की, अर्चनाला वाटते की मुनवरमुळे तिचे ३५ वर्षांचे लग्न आता मोडेल. अर्चना म्हणाली, “आमचं लग्न होऊन ३५ वर्षे झाली आहेत, आणि आता या मुनव्वर ते मोडेल.” यानंतर लगेचच परमीतने “धन्यवाद, मुनव्वर असं म्हणत मजेशीर उत्तर दिले. परमीतचे हे गंमतीशीर बोलणं ऐकून अर्चना त्याला मारते.

Loading...

अर्चना आणि परमीत यांच्यातील मजेशीर संवाद पाहून लोकांनाही हसू अनावर झाले. या जोडप्याचे लग्न १९९२ मध्ये झाले. त्यांना दोन मुलगे आहेत. संपूर्ण कुटुंब व्लॉगिंग करतात. अर्चना अनेक वर्षांपासून कपिल शर्माच्या शोमध्ये परीक्षक आहे. ‘पती पत्नी और पंगा सीझन २’ मध्ये तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सर्वांनी तिच्या व्लॉग्समध्ये तिच्या पतीसोबतची तिची केमिस्ट्री पाहिली आहे. आता हीच केमिस्ट्री टीव्हीवरही पाहायला मिळणार आहे.

‘पती पत्नी और पंगा सीझन २’ बद्दल बोलायचे झाल्यास, टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स यात दिसणार आहेत. दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया, राहुल वैद्य-दिशा परमार, शब्बीर अहलुवालिया-कांची कौल, अर्जुन बिजलानी-नेहा स्वामी, दीपिका सिंग-रोहित राज गोयल, मनोज तिवारी-सुरभी तिवारी हे या शोमधील स्पर्धक आहेत. सर्व जोडप्यांना मजेशीर टास्कला सामोरे जावे लागेल, मागच्या वेळेप्रमाणेच, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनव्वर आणि सोनाली बेंद्रे करत आहेत. मागील सिझन गाजल्यानंतर आता या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us