
मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे हे नेहमीच एकसोबत दिसतात. मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्यापेक्षा अर्जुन कपूर हा तब्बल 11 वर्षांनी लहान आहे. अनेकजण यावरून यांच्यावर टिका देखील करताना दिसतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायम विदेशात फिरण्यासाठी देखील जातात. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिचे खास फोटो हे अर्जुन कपूर याने शेअर केले होते.
एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून तूफान रंगत आहे की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. इतकेच नाही तर मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याच्या कुटुंबातील काही सदस्यांना सोशल मीडियावरून अनफाॅलो देखील केले आहे, ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि ब्रेकअपच झाले असा अंदाजा अनेकांनी काढला.
इतकेच नाही तर ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनीही बोलणे टाळले. आता नुकताच अर्जुन कपूर याने इशाऱ्या इशाऱ्यामध्ये ब्रेकअपच्या चर्चांवर भाष्य केले आहे. नुकताच मलायका अरोरा हिने डाॅग कैस सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही फोटोशूट करताना दिसत आहे.
आता मलायका अरोरा हिच्या या व्हिडीओवर चक्क अर्जुन कपूर यानेच कमेंट केलीये. अर्जुन कपूर याने केलेली ही कमेंट पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का हा बसलाय. या व्हिडीओवर अर्जुन कपूर याने हार्ट इमोजी आणि फायर इमोजी शेअर केलीये. इतकेच नाही तर प्रेमाची देखील इमोजी शेअर केलीये.
अर्जुन कपूर याने शेअर केलेल्या या कमेंटमुळे हे स्पष्ट झाले आहे की, मलायका आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप हे झाले नाहीये. यांच्या ब्रेकअपच्या फक्त आणि फक्त अफवाच आहेत. मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिने घातलेल्या टी-शर्टवर चला वेगळे होऊया असे लिहिले होते.
इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा ही एकटीच पार्टी करताना दिसली होती. अर्जुन कपूर हा देखील मलायका अरोरा हिला सोडून विदेशात धमाल करताना दिसला. अनेकांनी मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याच्या बहिणींना सोशल मीडियावरून अनफाॅलो केल्याने आर्श्चय व्यक्त केले होते.