AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच मलायका अरोरा हिने घातला चक्क असा शर्ट, चाहत्यांना बसला मोठा धक्का

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे त्यांच्या रिलेशनमुळे नेहमीच चर्चेत असतात. चाहते गेल्या काही वर्षांपासून यांच्या लग्नाची वाट देखील बघत आहेत. मात्र, आता यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे.

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच मलायका अरोरा हिने घातला चक्क असा शर्ट, चाहत्यांना बसला मोठा धक्का
| Updated on: Aug 26, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका ही  अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. विशेष म्हणजे सुरूवातीला हे दोघेही आपल्या नात्याबद्दल लपवताना दिसत होते. मात्र, आता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा हे पार्टी आणि अनेक शोमध्ये एकसोबत हजेरी लावतात. इतकेच नाही तर नेहमीच मुंबईमध्ये स्पाॅट होतात. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याचा खास फोटो मलायका हिने सोशल मीडियावर शेअर केला होता.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे काही दिवसांपूर्वी विदेशात धमाल करताना दिसले होते. अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिचे काही खास फोटो शेअर केले होते. अनेकांना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची जोडी प्रचंड आवडते. इतकेच नाही तर चाहते यांच्या लग्नाची वाट पाहताना देखील दिसत आहेत.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. मात्र, यावर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी काहीच भाष्य केले नाहीये. सुट्टयांमध्ये धमाल करताना एकटाच अर्जुन कपूर हा दिसला. यावेळीचे काही स्पेशल फोटो हे अर्जुन कपूर याने इंस्टाग्रामवर शेअर देखील केले.

नुकताच मलायका अरोरा ही मुंबईमध्ये स्पाॅट झालीये. मात्र, यावेळी मलायका अरोरा हिने घातलेल्या टी- शर्टवरून अनेक चर्चांना उधाण आले आहे. मलायका अरोरा हिने घातलेल्या शर्टवर लिहिण्यात आले होते की, ‘Lets fall apart’ चला वेगळे होऊया. आता मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का हा बसला आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे त्यांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर नेहमीच रिप्लाय करताना दिसतात. मात्र, हे पहिल्यांदाच होत आहे की, त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा इतक्या जास्त सुरू आहेत, मात्र यांनी त्यावर अजून काहीच भाष्य केले नाहीये. इतकेच नाही तर अर्जुन कपूर याचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले देखील जात आहे.

मलायका अरोरा ही देखील अर्जुन कपूर याला सोडून पार्टी करताना दिसली आहे. यामुळे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सोशल मीडियावरही एकमेकांचे फोटो कायमच शेअर करताना दिसतात. मात्र, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान एकही फोटो एकमेकांचा यांनी शेअर केला नाहीये.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल