Malaika Arjun: मलायकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर अर्जुन कपूरने सोडलं मौन

मलायका गरोदर असल्याच्या चर्चांवर अर्जुनची पहिली प्रतिक्रिया

Malaika Arjun: मलायकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर अर्जुन कपूरने सोडलं मौन
'आम्ही एकमेकांसाठी...', मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अर्जुन कपूर याचा मोठा खुलासाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 9:38 AM

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या रिलेशनशिपविषयी, लग्नाविषयी अनेकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण येतं. त्यातच आणखी एक भर पडली ती म्हणजे मलायकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांची. मलायका अरोरा गरोदर असल्याची चर्चा बुधवारी दुपारपासून सोशल मीडियावर सुरू झाली. त्यावर आता अर्जुन कपूरने उत्तर दिलं आहे. इतकंच नव्हे तर अशा वृत्तांवर त्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मलायकाच्या प्रेग्नंसीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याने लिहिलं, “तुम्ही सर्वांत खालची पातळी गाठली आहे आणि ते सुद्धा अत्यंत अनौपचारिक, असंवेदनशील आणि अनैतिक पद्धतीने तुम्ही ही बातमी दिली. हा पत्रकार सतत अशा बातम्या लिहितो आणि आम्ही फेक गॉसिप आर्टिकल्सकडे दुर्लक्ष करतो म्हणून त्याचं निभावून जातं. पण आता पुरे झालं.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका, असा थेट इशारा अर्जुनने या पोस्टद्वारे दिला. अर्जुन आणि मलायका लवकरच आई-बाबा बनणार आहेत, अशा आशयाचं हे वृत्त होतं. इतकंच नव्हे तर लंडनच्या ट्रिपदरम्यान दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना याविषयीची माहिती दिली, असंही त्यात म्हटलंय.

मलायका आणि अर्जुन यांचं नातं नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. या दोघांनी 2019 मध्ये रिलेशनशिप जाहीर केलं होतं. वयातील अंतरामुळे या दोघांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलसुद्धा केलं गेलं.

मलायकाशी इतक्यात लग्न करण्याचा कोणताच विचार नसल्याचं अर्जुनने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. सध्या तो करिअरवर अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याचं त्याने पुढे सांगितलं. “प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास लॉकडाऊनमध्ये गेलेली दोन वर्षं, कोरोना महामारी आणि त्यामुळे बदललेल्या गोष्टी कारणीभूत आहेत. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे”, असं अर्जुन म्हणाला होता.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.