
Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने ‘लेडीलव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी कुटुंबियांच्या सहमतीने 5 मार्च रोजी लग्न केलं. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात क्रिकेट विश्वातील दिग्गजांपासून, बॉलिवूडकर आणि अनेक उद्योजकांनी देखील हजेरी लावली… मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये सानिया आणि अर्जुन यांचं लग्न पार पडलं. सध्या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सानिया आणि अर्जुन यांच्या लग्नासाठी अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, अंबानी कुटुंब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. मराठमोळी अभिनेत्री काजल काटे – कदम देखील उपस्थित होती…
सध्या सानिया आणि अर्जुन यांच्या लग्न सोहळ्यातील काजल हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, काजोल हिचा पती आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये फिटनेस कोच म्हणून काम पाहात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फिटनेस कोच म्हणून काम पाहत आहे. मुंबई इंडियन्सच्या अनेक क्रिकेटपटूसोबत त्याची खास आणि जवळची मैत्री आहे…
काजल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली. मालिकेतील काजल हिच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अर्जुन आणि सनिया यांच्या लग्नातील अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचं लग्न…
अर्जुन याची पत्नी सानिया चंडोक कोणतं साध नाव नाही. सानिया भारतातील दिग्गज उद्योजक आणि ग्रेव्हिस ग्रुपचे (Graviss Group) अध्यक्ष रवी घई यांची नात आहे. सानियाने परदेशात व्यवसाय आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे आणि ती तिच्या कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय भूमिका बजावते, ज्यामध्ये हॉस्पिटॅलिटी आणि लाइफस्टाइल ब्रँडचा समावेश आहे. सानियाच्या कुटुंबाने भारतात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बास्किन-रॉबिन्स लाँच केला.