AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arun Govil: जेव्हा एअरपोर्टवर ‘प्रभू श्रीराम’ भेटतात; व्हिडीओ होतोय व्हायरल

चाहत्यांनी त्यांना विमातळावरच हार घालत त्यांचे चरण स्पर्श केले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आयएएस अधिकारी सुमिताने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंट वर शेअर केला आहे.

Arun Govil: जेव्हा एअरपोर्टवर 'प्रभू श्रीराम' भेटतात; व्हिडीओ होतोय व्हायरल
Arun Govil Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2022 | 1:51 PM
Share

टीव्ही इंडस्ट्रीतील ‘रामायण'(Ramayan) ही मालिकेचा आजही प्रेक्षकांवर मोठा प्रभाव आहे. रामानंद सागर (Ramanand Sagar)सागर निर्मित रामायण मालिकेने कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात प्रभू रामचंद्राची प्रतिमा निर्माण केली. या मलिकेत प्रभू राम यांची भूमिका अभिनेता अरुण गोविल(Arun Govil) यांनी साकारली होती. प्रेक्षकांच्या मनात आजही त्यांची प्रतिमा प्रभू रामाची आहे. नुकताच याचा प्रत्यय आला.

तर झालं असं कि, रामायणात रामाची भूमिका साकारलेले अभिनेता अरुण गोविल रामलीलाच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निघाले होते. अरुण विमातळावर पोहचताच चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. चाहत्यांनी त्यांना विमातळावरच हार घालत त्यांचे चरण स्पर्श केले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आयएएस अधिकारी सुमिताने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंट वर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की जेव्हा अरुण गोविल विमानतळावर येतात तेव्हा भगव्या रंगाची साडी नेसलेली महिला तसेच पुरुष पुढे येत अरुण यांच्या पाया पडत आहे, तसेच स्वतः सोबत आणलेली शाल त्यांच्या खांद्यावर टाकत त्यांनानमस्कार करत आहेत. या घटनेमुळे चकित झालेल्या अरुण यांनी संबंधित महिलेला हात जोडून नमस्कार केला आहे .

View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

हा व्हिडीओ ट्विट करत सुमिताने लिहिले आहे, की रामायण मालिका टीव्हीवर येऊन ३५ वर्षेपूर्ण झाली. मात्र आजही प्रभू रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल हेच सर्वांसाठी भगवान श्रीराम आहेत. अरुण यांनीही आपल्या इन्स्टावरून हा व व्हिडिओ ट्विट केला आहे. विमातळावर अरुण गोविल यांना भेटून ती महिला भावूक झालेली दिसून येत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.