
Sameer Wankhede on Aryan Khan: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सीरिजमध्ये आर्यनच्या अटकेबद्दल देखली एक सीन आहे. ज्यामुळे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मानहानीचा खटला दाखल केला आहे. 2021 मध्ये ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आता आर्यन खान याला बळीचा बकरा बनवण्यात आलेलं नाही… असं वक्तव्य खुद्द समीर वानखेडे यांनी केलं आहे… शिवया शाहरुख खान याने खासगी चॅट लीक केल्याच्या अफवा देखील फेटाळल्या आहेत.
2021मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सीरिजमधील एका दृश्यावरून झालेल्या वादानंतर समीर वानखेडे यांनी आपलं मौन सोडलं आहे. एजन्सीच्या कारवाईचं समर्थन करताना, त्यांनी सांगितलं की, हाय-प्रोफाइल तपासादरम्यान उचललेले प्रत्येक पाऊल कायद्याच्या कक्षेत होते.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणावर मौन सोडलं. परंतु मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे आर्यनबद्दल थेट बोलू शकत नसल्याने, त्यांनी अंमली पदार्थांच्या तपासाबद्दल तपशीलवार सांगितलं आणि अटकेचं एकमेव कारण ड्रग्जची जप्ती नव्हती… असं देखील सांगितलं.
समीर वानखेडे म्हणाले, ‘लोकांचा एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे तुमच्याकडे ड्रग्स आढळले नाहीतर, तुमच्यावर कारवाई होणार नाही. जर कोणाला ड्रग्ससोबत पकडलं जात आहे, तर कोणी त्याला बनवलं असेल.. कोणी तस्करी केली असेल.. तर कोणी ड्रग्स खरेदी केले असतील… कायद्यानुसार सखोल चौकशी केली जाईल. त्यामुळे कोणीही बळीचा बकरा नव्हता. प्रत्येक अटक इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि जबाबांवर आधारित होती.”
समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं की, अशा कारवायांमध्ये अनेक अधिकारी सामिल असतात. अनेक स्तरांवर चौकशी होते आणि सावधानी बाळगून कागदपत्र समोर ठेवली जातात. हे वैयक्तिक विवेकबुद्धीनुसार केलं जात नाही….
2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर आर्यन खानला अटक करण्यात आली. आर्यन खानच्या ताब्यातून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नाहीत. त्याला कट रचणे आणि अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि जामीन मंजूर होण्यापूर्वी त्याला 25 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. अखेर काही महिन्यांनंतर, एनसीबीने आर्यन याला क्लीन चिट दिली आणि म्हटलं की त्याच्याविरुद्ध ड्रग्ज सेवन किंवा तस्करीचा कोणताही पुरावा नाही.