3 महिन्यांच्या प्रेग्नंट असताना आशा भोसलेंनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; खाल्ल्या होत्या झोपेच्या गोळ्या
आशा भोसले या नावाला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांच्या गाण्याची आणि त्यांच्या आवाजाची जादू इंडस्ट्रीत आजही कायम आहे. त्यांचं करिअर जेवढं यशस्वी राहिलं तेवढाच त्रास त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सहन केला आहे. त्यांच्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या या सर्व घटनांचा उल्लेख केला आहे.

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या आवाजाचे जवळपास सर्वच चाहते आहेत. त्यांच्या बहिणी आणि दिवंगत लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच, आशा ताईंनीही या इंडस्ट्रीला त्यांनी खूप काही दिलं आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे आणि अजूनही त्या इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. आशा ताईंना इंडस्ट्रीत जितके प्रेम मिळाले तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवनही वेदनादायी होते.
‘ आशा भोसले: अ लाईफ इन म्युझिक ‘
आशा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिल्याचं म्हटलं जातं. अलिकडेच, आशा ताईंनी पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या लग्नाबद्दल उघडपणे सांगितले. ‘ आशा भोसले: अ लाईफ इन म्युझिक ‘ या त्यांच्या चरित्रात, आशा ताईंनी त्यांच्या आयुष्यातील त्या पैलूंबद्दल लिहिले आहे, ज्याबद्दल आजपर्यंत त्यांच्या काही जवळच्या लोकांनाच माहिती होते.
आशा घरातून पळून गेल्या होत्या आशाताईंचा संघर्ष त्यांच्या बालपणापासून सुरू झाला. त्यांची तुलना तिच्या बहिणीशी केली जात असतानाही, आशाने हार मानली नाही. लता मंगेशकर आणि आशाताईंमध्ये मात्र अशी कोणतीही स्पर्ध नव्हती. त्या दोघींचाही एकमेकींवर खूप जीव होता. आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या कलाकाराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. आशा यांच्यावरील हे पुस्तक लेखिका रम्या शर्मा यांनी त्यांच्या शब्दात मांडले आहे. या पुस्तकात असे म्हटले आहे की 1949 मध्ये, जेव्हा आशाताई 16 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्या गणपतराव भोसलेंसोबत घरातून पळून गेल्या होत्या. पुस्तकात असे म्हटले आहे की आशाताईंची मोठी बहीण लता मंगेशकर या आशाताईंच्या लग्नावर अजिबात खूश नव्हत्या आणि त्यांनी बराच काळ आशाताईंशी बोलणेही बंद केले होते.
पती गणपतराव 20 वर्षांनी मोठे होते पुस्तकानुसार, आशा यांचे पती गणपतराव भोसले हे त्यांच्यापेक्षा सुमारे 20 वर्षांनी मोठे होते आणि काही दिवसांनी सर्व काही व्यवस्थित चाललेलं असताना आशा आणि गणपतराव यांच्यात गोष्टी बिघडू लागल्या होत्या. पुस्तकात लिहिले आहे की, असं म्हटलं जायचं की, गणपतराव मद्यपी होते आणि दारू पिल्यानंतर ते आपला राग गमावून बसायचे आणि दारू पिऊन पत्नीवर हात उचलायचे.
आशा गर्भवती असतानाही गणपतरावांनी त्यांच्यावर हात उचलला
पुस्तकानुसार, आशा गर्भवती असतानाही गणपतरावांनी त्यांच्यावर हात उचलला आणि त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. पुस्तकात, आशा यांनी सांगितले आहे की त्यांचे सासरचे लोक खूप संकुचित विचारांचे होते आणि त्यांची सून एक गायन सुपरस्टार आहे हे त्यांना सहन होत नव्हते. त्यांनी म्हटले आहे की, “माझा नवरा खूप रागीट होता. कदाचित त्याला मला दुखावण्यात मजा येत असे. तो एक दुःखी व्यक्ती होता. पण बाहेरील कोणालाही हे माहित नव्हते. मी माझी सर्व कर्तव्ये पार पाडली, जसे हिंदू धर्मातील पत्नी करते.”
आशाताईंना आत्महत्या का करायची होती?
पुस्तकात सांगितल्याप्रमाणे जेव्हा आशा भोसले त्यांच्या तिसऱ्या मुला आनंदच्या वेळी गरोदर होत्या, तेव्हा त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना घराबाहेर हाकलून लावले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि याच वेळी आशा यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुस्तकात आशा यांनी म्हटलं आहे की, “एकेकाळी मला वाटले की मी स्वतःचा जीव घ्यावा. मी आजारी होते, चार महिन्यांची गर्भवती होते, रुग्णालयात परिस्थिती अशी होती की हे नरक आहे असे वाटत होते. मी मानसिकदृष्ट्या इतकी खचले होते की मी झोपेच्या गोळ्यांची एक संपूर्ण बाटली खाल्ली. पण माझ्या मुलावर माझे प्रेम इतके होते की त्याने मला मरू दिले नाही. मला काहीही झाले नाही.” या नात्यातून बाहेर पडल्यानंतर अनेक वर्षांनी आशा यांनी प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आर.डी. बर्मन यांच्याशी लग्न केले. तथापि, काही वर्षांनी ते दोघेही वेगळे झाले.
View this post on Instagram
आशाताई मुलगा आणि मुलीच्या मृत्यूने तुटल्या होत्या
त्रासदायक गोष्ट म्हणजे 2008 मध्ये आशाताईंची मुलगी वर्षा हिनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिनेही झोपेच्या गोळ्या घेतल्या. मात्र ती यातून वाचली, पण 2012 मध्ये वर्षा हिने स्वतःवर गोळी झाडली. वृत्तानुसार, गणपत राव लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते. आशा आणि गणपत राव यांचा मुलगा हेमंत यांच्या जन्मानंतरच मंगेशकर कुटुंबाने आशाताईंना सर्व राग-रुसवे विसरून पुन्हा घरात घेतलं होतं. आशा आणि गणपत राव यांना तीन मुले होती हेमंत, आनंद आणि मुलगी वर्षा. मुलगी वर्षा हिच्या मृत्यूनंतर, त्यांचा मोठा मुलगा हेमंतही स्कॉटलंडमध्ये कर्करोगाने मरण पावला. आपल्या दोन्ही मुलांच्या मृत्यूचे दु:ख त्यांना सहन करावे लागले.
