AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle Death : माझ्या आयुष्यावर बायोपिक आल्यास त्यात..स्वत: आशा भोसले यांनी या दोन अभिनेत्रींची घेतलेली नावं

Asha Bhosle Death : आशा भोसले यांना 2018 साली त्यांच्या जीवनावर चित्रपट आल्यास पडद्यावर कुठल्या अभिनेत्रीने त्यांची व्यक्तीरेखा साकारली पाहिजे?असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर आशा भोसले यांनी दोन अभिनेत्रींची नाव घेतलेली.

Asha Bhosle Death : माझ्या आयुष्यावर बायोपिक आल्यास त्यात..स्वत: आशा भोसले यांनी या दोन अभिनेत्रींची घेतलेली नावं
asha bhosle
| Updated on: Apr 13, 2026 | 11:54 AM
Share

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने फक्त संगीत क्षेत्राचीच नाही, तर सगळ्या चित्रपट सृष्टीची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. आपल्या आठ दशकांच्या करिअरमध्ये आशा भोसले यांनी 20 भाषांमध्ये जवळपास 12 हजार गाणी गायली. काल 12 एप्रिलला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. निधना समयी आशा भोसले यांचं वय 92 वर्ष होतं. आशाताईंच्या निधनानंतर जगभरातून लोक वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शोक भावना व्यक्त करत आहेत. आशा भोसले यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी भारतीय संगीत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आशा भोसलेंसारख्या व्यक्तीचं जेव्हा निधन होतं, तेव्हा भविष्यात पुढे-मागे त्यांच्या जीवनावर चित्रपट येऊ शकतो.

आशा भोसले यांच्यावर चित्रपट आल्यास पडद्यावर कुठल्या अभिनेत्रीने त्यांची व्यक्तीरेखा साकारली पाहिजे?. 2018 साली आशा भोसले यांना हा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर त्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं. डिसेंबर 2018 साली बॉम्बे टाइम्सच्या एका इंटरव्यूमध्ये लेजेंडरी सिंगर आशा भोसले यांनी आपल्या बायोपिकच्या विषयावर खूप इंटरेस्टिंग टिप्पणी केलेली. तुमच्या आयुष्यावर चित्रपट आल्यास कुठल्या अभिनेत्रीने तुमची भूमिका साकारली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? त्यावेळी आशा भोसले यांनी फार वेळ न घेता थेट उत्तर दिलेलं. त्यांनी दोन नाव घेतलेली. “मला वाटतं प्रियंका चोपडा जोनास माझा रोल पडद्यावर परफेक्ट साकारु शकते. कंगना रणौत सुद्धा चांगली अभिनेत्री आहे. मला वाटतं, ती सुद्धा माझ्या रोलसाठी शानदार निवड ठरु शकते”

एका सिनेमाच्या स्टोरीसारखं आयुष्य

हे बोलतानाचा आशा भोसले यांनी एक मजेशीर टिप्पणी केलेली. “हे सर्व बोलल्यानंतरही मला वाटतं की, माझ्या आयुष्यावर कधी चित्रपट बनेल असं मला वाटत नाही” हे वक्तव्य त्यावेळी खूप चर्चेत राहिलेलं. कारण बॉलिवूडमध्ये त्यावेळी बायोपिक्सचा ट्रेंड जोरात सुरु होता. आशा भोसले यांचं स्वत:च आयुष्य एका सिनेमाच्या स्टोरीसारखं आहे. गरीबीपासून सुरु होणारी ते संगीत विश्वावर राज्य करेपर्यंतची त्यांची कथा खूप रोमांचक आहे. दिग्गज गायिका बहिण लता मंगेशकर यांच्यासोबतच त्यांचं नातं, आरडी बर्मन यांच्यावर प्रेम आणि हजारो गाण्यांचा वारसा. आशा भोसले यांच्या प्रवासाला 1940 पासून सुरुवात झाली. आजही त्यांच्या आवाजाची प्रेक्षकांवरील जादू कायम आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं