Ashok Saraf : कुर्ता आणि धोतर नेसून अशोक सराफ बसले लॅम्बोर्गिनीमध्ये, व्हायरल व्हिडीओने पाहून स्वप्नील जोशी म्हणाला…
Ashok Saraf : सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते लॅम्बोर्गिनी या लग्झरी कारमध्ये बसताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अभिनेता स्वप्नील जोशीने कमेंट केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे अशोक सराफ. त्यांनी गेली सहा दशके फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ यांचा वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे.
अशोक सराफ हे कायम त्यांच्या साधेपणामुळे ओळखले जातात. कधीही त्यांनी कोणताही बडेजाव केला नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशोक सराफ हे थेट लॅम्बोर्गिनीमध्ये येऊन बसतात आणि गाडी घेऊन तेथून निघून जातात. हा व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. अशोक सराफ यांनी इतकी महागडी गाडी कधी घेतली? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
View this post on Instagram
काय आहे व्हायरल व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अशोक सराफ हे एका बिल्डींगमधून बाहेर येताना दिसत आहेत. त्यांनी राखाडी रंगाची कुर्ता घातला आहे. तर पांढऱ्या रंगाचे धोतर नेसले आहे. अशोक सराफ हे अतिशय साध्या लूकमध्ये दिसत आहेत. पण नंतर ते भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी गाडीमध्ये बसतात. गाडीत बसण्यापूर्वी ते पायालले भगव्या रंगाचे फ्लिपफ्लॉप काढून बाजूला ठेवतात. अशोक सराफ यांचा हा स्वॅग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अशोक सराफ यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ खरा आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींना हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. तर, अनेक चाहत्यांनी अशोकमामांना या लूकमध्ये पाहायला नक्की आवडेल, असेही म्हटले आहे.
काहींनी चूक शोधून काढली
अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी काही गोष्टी नोटीस केल्या आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की अशोक सराफ जेव्हा गाडीत बसतात तेव्हा त्यांच्या पायात भगव्या रंगाचे फ्लिपफ्लॉप असतात. पण जेव्हा ते गाडीतून खाली उतरतात तेव्हा त्यांच्या पायात वेगळीच चप्पल असते. यावरुन हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचे स्पष्ट होते. अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ पाहून अभिनेता स्वप्नील जोशीने देखील कमेंट केली आहे. त्याने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
