Ashok Saraf : ‘एका अंगठीची गोष्ट.. ’50 वर्षांपासून अशोक सराफ यांनी बोटातून काढली नाही ती अंगठी, असं काय खास ?

अशोक सराफ यांच्या बोटातील ५० वर्षांपासूनची अंगठी अनेक गूढ गोष्टी सांगते. १९७४ मध्ये मित्राने दिलेली ही नटराजाची अंगठी त्यांनी कधीच काढली नाही. 'पांडू हवालदार' चित्रपटाची ऑफर अंगठी घातल्याच्या तिसऱ्याच दिवशी आली आणि त्यांचे नशीबच बदलले. ही अंगठी त्यांच्या यशाची साक्षीदार आहे, जी ते आजही जीवापाड जपतात.

Ashok Saraf : एका अंगठीची गोष्ट.. 50 वर्षांपासून अशोक सराफ यांनी बोटातून काढली नाही ती अंगठी, असं काय खास ?
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
| Updated on: Jun 10, 2026 | 11:43 AM

आहेत. इंडस्ट्रीत सगळे त्यांना अशोक मामा याच नावाने ओळखतात , हाक मारतात. त्यांचा अभिनय, काम याप्रमाणेच, वैयक्तिर आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता अते. त्यांना काय आवडतं, कोणता नट आवडतो, खाण्याचा फेव्हरिट पदार्थ कोणता, त्यांचा मुलगा काय करतो, कोणत्या क्षेत्रात आहे, असे एका ना अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात.

अशोक सराफ यांच्या बोटात कित्येक वर्षांपासून एक अंगठी आहे, जिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या 5 दशकांपासून ती अंगठी अशोक सराफ यांच्या उजव्या हाताच्या बोटात आहे आणि त्यांनी ती कधीच काढली नाहीये. ती अंगठी त्यांच्यासाठी अतिशय खास असून ते ती खूप जपातत. ती अंगठी कोणी दिली, कधी घातली, याचा एक रंजक किस्सा समोर आला आहे. चला जाणून घेऊया…

एक अंगठीची खास गोष्ट..

अशोक सराफ यांच्या बोटात असलेल्याल्या या अंगठीची ही खूपच खास गोष्ट आहे. झालं असं की 1974 साली अशोक सराफ यांना ही अंगठी त्यांचा मित्र विजय लवेकर यांनी दिली होती. विजय लवेकर हे मेकअपआर्टिस्ट म्हणून या मनोरंजन सृष्टीत काम करत होते, ते खूप फेमस. पण त्याचबरोबर त्यांचं चांदीकाम आणि सराफीच एक छोटीशी पेढीदेखल होती.

एकदा काय झालं की, विजय लवेकर हे त्यांनी बनवलेल्या काही खास डिझाईनच्या अंगठ्या घेऊन स्टुडिओमध्ये आले होते. एका बॉक्समध्ये असलेल्या अनेक अंगठया त्यांनी अशोक सराफ यांना दाखवल्या आणि त्यातली एक अंगठी निवडा असं ही त्यांनी अशोक मामांना सांगितलं. मात्र बॉ्कसमधल्या एवढ्या सुंदर अंगठ्या पाहून, त्यातली नेमकी निवडायची कोणती ? असा प्रश्न अशोक सराफ यांना पडला. मग हाताला लागणारी पहिलीच अंगठी त्यांनी निवडली आणि लगेच उजव्या हाताच्या अनामिकेत ती अंगठी त्यांनी चढवली. त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरण्यात आली होती.

विशेष म्हणजे ती अंगठी अशोक सराफ यांच्या बोटात अगदी फिट बसली होती. अगदी सोनाराकडे माप वगैरे देऊन बनवावी, एवढी सहज ती त्यांच्या बोटात फिट झाली. त्या अंगठीकडे निरखून पाहत असताना अशोक मामांना ती भलतीच आवडली आणि ते विजय लवकर यांना म्हणाले की आता ही अंगठी माझी. तेव्हापासून ती अंगठी ते बोटात घालू लागले.

तिसऱ्याच दिवशी खास अनुभव

ती अंगठी घातल्यावर अगदी तिसऱ्याच दिवशी अशोक सराफ यांना खूप चांगला अनुभव आला. पांडू हवालदार या चित्रपटाअगोदर अशोक सराफ यांची कारकीर्द चाचपडत चालत होती. यशासाठी ते खूप मेहनत करत होते, मात्र म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. मात्र अंगठी घातल्यावर अगदी तिसऱ्याच दिवशी त्यांना पांडू हवालदार चित्रपटाची ऑफर मिळाली. अशोक सराफ यांनी तो चित्रपट स्वीकारला आणि पुढे जो इतिहास चित्रपटाने घडवला, तो सर्वांनाच माहीत आहेच. चित्रपट खूप यशस्वी ठरला आणि अशोक सराफ यांचा नाव घराघरांत पोहोचलं. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलचं नाही. त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा हा चित्रपट, या चित्रपटाने त्यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला. हा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनीच सांगितला होता. ते म्हणाले, श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा काहीही म्हणा, पण तेव्हापासूनच ही अंगठी कधीही बोटातून काढायची नाही असा मी निर्णय त्यावेळी घेतला होता. आता या घटनेला 50 वर्ष होऊन गेलीत. गेल्या 50 वर्षांपासून ती अंगठी अशोक मामांच्या बोटात तेव्हा घातली तशीच आजही आहे. ती खास अंगठी अशोक मामा आजही जीवापाड जपतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us