AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

421 दिवसांपासून ओटीटीवर धुमाकूळ घालतेय ही सीरिज, एकदा बघायला सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक

‘मिर्झापूर’चा ओटीटीवर दबदबा कायम. गेल्या 421 दिवसांपासून प्राइम व्हिडीओच्या टॉप 10 मध्ये सीरिजचा समावेश. चित्रपटाने देखील केली दमदार कमाई.

421 दिवसांपासून ओटीटीवर धुमाकूळ घालतेय ही सीरिज, एकदा बघायला सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 16, 2026 | 3:19 PM
Share

लोकप्रिय वेबसीरिज ‘मिर्झापूर’ने आपल्या दमदार कथानकामुळे, भन्नाट संवादांमुळे आणि लक्षवेधी व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले असून, एकूण 29 भाग प्रदर्शित झाले आहेत. आता या फ्रँचायझीचा चित्रपटही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील ‘मिर्झापूर’ सीरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पंकज त्रिपाठी यांचा कालीन भैया, अली फजलचा गुड्डू पंडित आणि दिव्येंदूचा मुन्ना त्रिपाठी या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. पूर्वांचलमधील गुन्हेगारी विश्व, सत्तासंघर्ष आणि कौटुंबिक संघर्ष यांचे चित्रण सीरिजमध्ये करण्यात आले आहे.

421 दिवसांपासून टॉप 10 मध्ये स्थान

‘मिर्झापूर’च्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, ही सीरिज तब्बल 421 दिवसांपासून प्राइम व्हिडीओच्या टॉप 10 यादीत स्थान टिकवून आहे, असा दावा करण्यात आला आहे. 15 सप्टेंबरच्या टॉप 10 यादीत ‘मिर्झापूर’ पाचव्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, सीरिजच्या चौथ्या सीझनचीही तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

‘मिर्झापूर : द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी

सप्टेंबर 2026 मध्ये ‘मिर्झापूर : द मूव्ही’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात पुन्हा एकदा लोकप्रिय व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या कमाईबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार, 11 दिवसांत भारतातील नेट कलेक्शन 190 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचले होते तर जगभरातील ग्रॉस कलेक्शन 270 कोटी रुपयांच्या जवळ गेले होते.

कालीन भैय्याची शांतता, गुड्डू पंडितचा आक्रमक स्वभाव आणि मुन्ना त्रिपाठीची महत्त्वाकांक्षा या व्यक्तिरेखांनी ‘मिर्झापूर’ला विशेष लोकप्रियता मिळवून दिली आहे. पूर्वांचलमधील बोलीभाषा, सत्तेचे राजकारण आणि गुन्हेगारी विश्वाचे चित्रण यामुळे या फ्रँचायझीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

ओटीटीवरील लोकप्रियतेनंतर आता मोठ्या पडद्यावरही ‘मिर्झापूर’चा दबदबा पाहायला मिळत आहे. सीरिजच्या पुढील सीझनची आणि फ्रँचायझीच्या भविष्यातील प्रोजेक्ट्सची चाहत्यांना उत्सुकता आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी देखील प्रेक्षक प्रचंड गर्दी करत आहेत.

Follow Us
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली