AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan: 5 वर्षांच्या सावत्र मुलासोबत आमिर खानचं नातं कसं? गौरीसोबत तिसऱ्या लग्नानंतर…

Aamir Khan: अभिनेता आमिर खान 3 मुलांचा बाप आहे. तर, गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत लग्न केल्यानंतर आमिर याचं सावत्र मुलासोबत कसं नातं आहे... याबद्दल देखील चर्चा रंगलेली असते... तर जाणून घ्या 5 वर्षांच्या सावत्र मुलासोबत कसं आहे आमिरचं नातं...

Aamir Khan: 5 वर्षांच्या सावत्र मुलासोबत आमिर खानचं नातं कसं? गौरीसोबत तिसऱ्या लग्नानंतर...
अभिनेता आमिर खान
| Updated on: Oct 30, 2026 | 2:34 PM
Share

Aamir Khan: बॉलिवूडचा प्रसिद्द आणि लोकप्रिय अभिनेता आमिर खान याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. अभिनेत्यानं दोन घटस्फोट झाल्यानंतर वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. अनेक वर्ष गौरी हिला डेट केल्यानंतर आमिर खान याने ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरी हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. गौरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिचं देखील पूर्वी लग्न झालेलं असून तिला 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. अशात अनेकांना असा देखील प्रश्न उपस्थित केला की, आमिर खान याचं सावत्र मुलासोबत नातं कसं आहे. ‘लगान’ सिनेमातील आमिर खानचा जवळचा मित्र, अमीन हाजी याने आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘रेडिफ’ सोबतच्या संभाषणात त्याने आमिर खान आणि गौरी स्प्राटचा मुलगा ‘क्विन’यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला आहे.

अमीन हाजी म्हणालेला, ‘क्विन फक्त 5 वर्षांचा आहे आणि तो अभिनेत्याला आमिर म्हणूनच हाक मारतो. दोघांच्या नात्याची सुरुवात नुकताच सुरु झाली असून, एक वर्षांत त्यांचं नातं फार घट्ट झालं. एके दिवशी आम्ही सर्वजण पंचगनीमध्ये बसलो होतो आणि गप्पा मारत होतो. आमिर खान साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होता, त्याच दरम्यान क्विन तिथे आला आणि त्यांनी आमिरला हाक मारली. क्विनने आमिरला बेडटाइम स्टोरीज सांगण्यास सांगितलं. आमिरने काहीही विचार न करता आमच्याकडे पाहिलं आणि सांगितलं की, मी थोड्याच वेळात येतो. आमिर क्विनसोबत त्याला गोष्ट सांगण्यासाठी निघून गेला.”

अमीन हाजी याने गौरीबद्दल देखील मोठं वक्तव्य केलेलं, “गौरी एक एंजेल आहे. ती खूप मॅच्युअर आणि समजूतदार आहे. तिने एक गोष्ट सांगितली होती जी माझ्या मनात कायमची घर करून राहिली, ती म्हणजे— ‘मला एक मुलगा आहे आणि त्याला माझ्या प्रेमाची गरज आहे. मला हे सुनिश्चित करावं लागेल की, मी माझ्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यात योग्य तो समतोल राखू शकेन.’ गौरी फक्त स्वतःचाच विचार करत नाही, तर आपल्या मुलाचाही विचार करते.’,  सांगायचं झालं तर, आमिर खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

Follow Us
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा