Ashok Shinde : ती मला फाडूनच खायची…अलका कुबल यांचा सेटवर असायचा दरारा, मराठी अभिनेत्यानं सांगितला किस्सा

Ashok Shinde On Alka Kubal : मराठी अभिनेते अशोक शिंदे यांनी एका मुलाखतीत अलका कुबल यांचा किस्सा सांगितला आहे.

Ashok Shinde : ती मला फाडूनच खायची...अलका कुबल यांचा सेटवर असायचा दरारा, मराठी अभिनेत्यानं सांगितला किस्सा
| Updated on: Nov 21, 2026 | 9:30 PM

मराठी अभिनेते अशोक शिंदे यांनी अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशोक शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अशोक सराफ, डॉक्टर श्रीराम लागू, अलका कुबल यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे. अशातच एका मुलाखतीत अशोक शिंदे यांनी अलका कुबल यांच्यासोबत जॅम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अशोक शिंदे म्हणाले की, ‘मी अशोक सराफ यांच्याकडून टाइमिंग बाबत शिकलो. सिनेमाच्या सेटवर ते कधीच कुणाला मला लवकर सोडणार नाहीत का? असं ते विचारत असलेलं मी ऐकलं नाही. एखादी वेळ त्यांना दिली की दुसऱ्या दिवशी ते अगदी त्याच वेळेला सेटवर हजर असायचे.’

‘एकदा एका सिनेमाच्या सेटवर त्यांना काहीही काम दिलं नव्हतं तरीही ते चार दिवस सेटवर असेच बसून होते. एकदा मी न राहून त्यांना विचारलं की, तुम्ही त्यांना सांगितलं नाही का की तुमचं शूटिंग आधी करून घ्या. तुम्ही असंच बसून आहात. यावर मला म्हणाले की, मी त्यांना आधीच माझ्या या तारखा दिल्या आहेत. मग मी त्यांना कसं काय सांगायचं. मला इथे या तारखांना थांबणं गरजेचं आहे.’ असं अशोक यांनी पुढे सांगितलं.

Loading...

अशोक शिंदे यांनी सांगितला किस्सा

अलका कुबल यांचा किस्सा सांगताना अशोक शिंदे म्हणाले की, ‘ती मला सीनियर होती. माझ्या आधी दोन सिनेमे तिचे आले होते. ती त्यावेळी मला अगदी फाडूनच खायची. नऊच्या शिफ्टला मी जर 9:10 किंवा 9:15 ला आलो तर संपलं. मग ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची. मग आम्ही मान खाली घालून राहायचं कारण ती भयंकर चिडलेली असायची. आम्ही दोघांनी साधारण 23 सिनेमे हीरो हीरोइन म्हणून केले आहे. कोल्हापूरला तिचं आणि तिच्या नवऱ्याचं प्रोडक्शन हाऊस आहे. त्याच प्रोडक्शन अंतर्गत आम्ही ‘सुहासिनीची सत्वपरीक्षा’ हा सुपरहिट सिनेमा केला होता. ती मला म्हणायची की, अशोक आज रात्री जागरण वगैरे करू नको. कारण, उद्या सकाळी लवकरची शिफ्ट आहे. सातची शिफ्ट असली की, साडेसहाला खाली जमायचं असायचं. पण, ती सकाळी साडेपाच वाजताच येऊन बेल मारायची. हे लोक दिग्गज असूनही आपल्या कामात अगदी चोख असायचे.’ ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक शिंदे बोलत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us