AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाचं करिअर का बर्बाद झालं? अश्विनी कौशलने सांगितलं कारण, ऐकून तुम्हाला देखील बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता गोविंदाचं करिअर का संपलं? अश्विनी कौशलने सांगितली त्या मागची कारणं. ऐकून तुम्हाला देखील बसेल धक्का.

गोविंदाचं करिअर का बर्बाद झालं? अश्विनी कौशलने सांगितलं कारण, ऐकून तुम्हाला देखील बसेल धक्का
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 28, 2026 | 6:01 PM
Share

90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या जबरदस्त डान्स आणि अभिनयाच्या जोरावर सुपरस्टार बनलेल्या गोविंदाने त्या काळात यशाची शिखरे गाठली होती. एकामागून एक हिट चित्रपट देत त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः राज्य केले. विशेषत कादर खानसोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. तसेच रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यासोबतच्या त्याच्या चित्रपटांनीही मोठे यश मिळवले.

मात्र, जितक्या वेगाने गोविंदाने यश मिळवले, तितक्याच वेगाने त्याच्या करिअरमध्ये घसरणही सुरू झाली. आज परिस्थिती अशी आहे की तो स्टेज शो किंवा विविध कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करताना दिसतो. त्याच्या या डाउनफॉलमागील कारणांवर अनेकांनी भाष्य केले असून, सेटवर उशिरा येणे आणि वेळेचे पालन न करणे हे एक प्रमुख कारण मानले गेले.

गोविंदा आजही कमबॅक करू शकतो?

दरम्यान, अभिनेता अश्विनी कौशलने नुकत्याच एका मुलाखतीत गोविंदाच्या करिअरमधील घसरणीबाबत आपले मत व्यक्त केले. सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, गोविंदाच्या डाउनफॉलमागे सर्वात मोठे कारण म्हणजे अंधविश्वास आहे. आयुष्यात यापेक्षा मोठे विष दुसरे काही नाही. या वहमामुळे त्याचा अॅटिट्यूड आणि वागणूक बदलली.

अश्विनी कौशल पुढे म्हणाला की, गोविंदा आजही कमबॅक करू शकतो. तो अजूनही इतका वयस्कर नाही. योग्य भूमिका मिळाली तर तो पुन्हा सुपरस्टार बनू शकतो असे त्याने नमूद केले. त्याने गोविंदाच्या प्रतिभेचे कौतुक करत त्याला एंटरटेनमेंटचा देव असे संबोधले.

पुनरागमनाचा प्रयत्न पण मिळालं अपयश

तसेच त्याने गोविंदाच्यात वाढलेल्या अंधश्रद्धेबद्दलही भाष्य केले. त्याच्या मते, तो भविष्यातील गोष्टींचा अंदाज लावू लागला होता आणि अनेकदा इतरांना सावध करण्याचा प्रयत्न करत होता पण इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत असेही त्याने सांगितले.

इंडस्ट्रीतील स्पर्धा आणि मत्सर यांचाही उल्लेख करत कौशल म्हणाला की, इथे फार कमी लोक इतरांच्या यशात आनंद मानतात. गोविंदासारख्या मोठ्या स्टारविषयीही अनेकांना मत्सर वाटत होता. गोविंदाने काही वर्षांच्या विश्रांतीनंतर रंगीला राजा या चित्रपटातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही त्याच्या कारकिर्दीतील अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

Follow Us
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट...
Big Breaking | उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट....कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान