Athiya Shetty | लग्नानंतर पहिल्यांदा कॅमेरासमोर आली अथिया शेट्टी; नेटकरी म्हणाले, ‘कसला इतका ॲटीट्यूड?

अथियाचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी अथियाला तिच्या लूकवरूनही ट्रोल करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर पापाराझींशी नीट न बोलता कारच्या दिशेने गेल्याने तिच्यावर सडकून टीका होत आहे.

Athiya Shetty | लग्नानंतर पहिल्यांदा कॅमेरासमोर आली अथिया शेट्टी; नेटकरी म्हणाले, कसला इतका ॲटीट्यूड?
Athiya Shetty | लग्नानंतर पहिल्यांदा कॅमेरासमोर आली अथिया शेट्टी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 29, 2023 | 7:33 PM

मुंबई: क्रिकेटर केएल राहुलशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री अथिया शेट्टी पहिल्यांदाच पापाराझींसमोर दिसली. मुंबईतील एका सलूनमधून बाहेर पडताना पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला. अथियाचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी अथियाला तिच्या लूकवरूनही ट्रोल करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर पापाराझींशी नीट न बोलता कारच्या दिशेने गेल्याने तिच्यावर सडकून टीका होत आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या काही दिवसांनंतर अथियाला मुंबईतील एका सलूनबाहेर पाहिलं गेलंय यावेळी तिने जीन्स आणि कॅज्युअल शर्ट घातला होता. अथियाच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूरही नव्हता. तिचा हा ‘कॅज्युअल लूक’ पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

सलूनमधून बाहेर पडल्यावर पापाराझींकडे न बघता किंवा त्यांच्याशी न बोलताच ती थेट निघाली, यावरूनही तिला ट्रोल केलं जातंय. ‘तिचा ॲटीट्यूड तर पहा, कशाला इतकं मागे लागता?’, असं एकाने लिहिलं. तर ‘यांच्याकडे दुर्लक्ष करा, बरोबर ते जमिनीवर येतील’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

‘यांना लग्नानंतर सासू सिंदूर, मंगळसूत्र, जोडवी, पैजण हे सर्व घालण्याचा आग्रह करत नाही का’, असाही सवाल एका नेटकऱ्याने केला आहे. ‘कसला इतका ॲटीट्यूड आहे? कशी आहेस असं ते विचारत आहे आणि ही अशी वागतेय जसं की ते रायफल घेऊन उभे आहेत’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी अथियाला ट्रोल केलं.

अथियाने 23 जानेवारी रोजी केएल राहुलशी लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला मोजके पाहुणे उपस्थित होते. आयपीएलच्या सिझननंतर अथिया आणि राहुल रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचं कळतंय.