Avinash Narkar: एका व्हिडीओमुळे अब्रू धुळीला मिळाली, अविनाश नारकर यांच्या डोळ्यात पाणी, नेमकी भानगड काय?
Avinash Narkar: अभिनेते अविनाश नारकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका घटनेविषयी सांगताना अक्षरश: रडताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी त्यांनी सत्य देखील सांगितले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून अविनाश नारकर ओळखले जातात. ते त्यांच्या भूमिकांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. त्यांनी ते सोशल मीडियावर सतत व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी रिल आणि रिअॅल अशा दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. आता हा व्हिडीओ नेमका काय आहे? चला जाणून घेऊया…
अविनाश नारकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते, नमस्कार मी जोशी मास्तर. माझ्या लेकीला दिवस गेले आहेत ही बातमी कळाल्याबरोबर मी अगदी मोठ्या उत्साहाने पुण्याची एसटी पकडून तिच्या घरी पुण्याला जायला निघालो होतो. पण या प्रवासामध्ये एका छोट्याशा व्हिडीओमुळे माझी आतापर्यंत कमावलेली सगळी अब्रू अक्षरश: धुळीला मिळवली. पण खरं सांगतो या सोशल मीडियाच्या रिलमध्ये जे काही दिसतं ते सगळंच रिअल असतं असं नाही असे बोलताना दिसत आहे.
अविनाश नारकर यांनी सांगितले सत्य
व्हिडीओमध्ये पुढे अविनाश नारकर हसतात आणि म्हणतात, तर हे होतं रिल. आता रिअल सांगतो. नमस्कार मी अविनाश नारकर. माझ्या सोशल मीडियावरच्या आतापर्यंतच्या सगळ्या रिल्सला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात, माझ्यावरमाझ्यावर अगदी भरभरून प्रेम करता तुम्ही सगळेजण पण यावेळी मी तुम्हाला एका वेगळ्याच भूमिकेतून भेटायला येणार आहे. जिथे रिल आणि रियल या दोन्हीचा संबंध येणार. तर सत्य घटनेवर आधारित, खऱ्या घटनांनी प्रेरित आमचा जनक नावाचा चित्रपट येत्या 13 नोव्हेंबरला महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित होत आहे. आमच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नक्की बघा.
जनक सिनेमाविषयी
एकंदरीत हा व्हिडीओ पाहून अविनाश नारकर त्यांचा आगामी सिनेमा जनकमधील भूमिकेविषयी बोलताना दिसत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री सायली संजीव, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर, विनिता काळे हे कलाकार दिसणार आहेत हा चित्रपट 13 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अविनाश नारकर यांचा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.