AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baahubali फेम ‘कटप्पा’च्या मुलीच्या सौंदर्यापुढे रश्मिका – समंथा फेल, जाणून घ्या काय करते काम?

प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षा कित्येक पटीने सुंदर दिसते Baahubali फेम 'कटप्पा'ची लेक... तिचं सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल..., सध्या सर्वत्र कटप्पाच्या मुलीच्या सौंदर्याची चर्चा...

Baahubali फेम 'कटप्पा'च्या मुलीच्या सौंदर्यापुढे रश्मिका - समंथा फेल, जाणून घ्या काय करते काम?
| Updated on: Apr 22, 2023 | 1:44 PM
Share

मुंबई : एखादा प्रसिद्ध सेलिब्रिटी असेल तर, त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याची देखील अनेक चाहत्यांची इच्छा असते. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेते सत्यराज. दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध सुपरस्टार सत्यराज यांची चर्चा कायम चर्चा रंगलेली असता. सत्यराज हे प्रसिद्ध अभिनेते असले तरी, त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सत्यराज यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण ‘बाहुबली’ सिनेमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सत्यराज यांनी ‘बाहुबली’ सिनेमात ‘कटप्पा’ भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘कटप्पा’ भूमिकेमुळे सत्यराज एका रात्रीत मोठे स्टार झाले. त्यांची भूमिका आणि डायलॉगने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं. आता सत्यराज यांच्या मुलीने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. सध्या सर्वत्र सत्यराज यांच्या मुलीच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.

‘कटप्पा’ भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या सत्यराज यांनी २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. खलनायक म्हणून त्यांनी अनेक सिनेमात भूमिका निभावली. सत्यराज यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा सीबीराज वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहे, तर त्यांची मुलगी दिव्या झगमगत्या विश्वापासून दूर आहे.

सत्यराज यांची मुलगी दिव्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, दिव्या लाइमलाइट आणि सिनेमांच्या दुनियेपासून दूर वेगळ्या क्षेत्रात स्वतःचं करियर बनवत आहे. सत्यराज यांची मुलगी दिव्या व्यवसायाने पोषणतज्ञ आहे. दिव्या झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

दिव्याचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ९५ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. दिव्या अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पदार्थांसंबंधित टिप्स शेअर करत असते. ती स्वतः फिटनेस फ्रिक आहे, एवढंच नाही तर, दिव्या सर्वांना फिट राहायला शिकवते. दिव्या सत्यराजला लहानपणापासूनच खेळण्याची खूप आवड आहे. खेळताना ती अनेकदा फोटो शेअर करत असते.

दिव्या झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, तिच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री रश्मिता मंदाना आणि समंथा रुथ प्रभू हिचं ग्लॅमर देखील फेल आहे. सोशल मीडियावर दिव्या कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्री नसली तरी दिव्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दिव्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

Follow Us
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
Pune | ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली मोठा घोटाळा? पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम, महत्त्वाच्या बैठकीला बड्या नेत्यांची दांडी
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल- सूत्रांची माहिती
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!