Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सलमान खान फेल! पहिल्या दिवशी सिनेमाने कमावले फक्त इतकेच रुपये…

बॉक्स ऑफिसवर सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा फेल; पहिल्या दिवशी कमावले फक्त इतकेच रुपये..., सर्वत्र भाईजानच्या आगामी सिनेमाची चर्चा...

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सलमान खान फेल! पहिल्या दिवशी सिनेमाने कमावले फक्त इतकेच रुपये...
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 12:54 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत होती. भाईजानचा नवा सिनेमा येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. अखेर अनेक दिवसांनंतर अभिनेता सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलमान चाहत्यांच्या भेटीस आला. ईदचं मुहूर्त साधत अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित झाला. पण यावेळी भाईजान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरल्याचं समोर येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने केलेल्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा भारतात एकून ४ हजार ५०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, परदेशाच सिनेमा १ हजार २०० प्रदर्शित करण्यात आला आहे. असं असताना देखील सिनेमा समाधानकारक कमाई करु न शकल्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांनी निराशा व्यक्त केल्याची चर्चा जोर धरत आहे.

सलमान खान याच्या ‘भारत’ आणि ‘टायगर जिंदा हैं’ सिनेमाने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. पण ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा येत्या दिवसांत किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रिपोर्टनुसार, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी फक्त १२ ते १३ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या कमाईचा पहिल्या दिवसाचा आकडा इतर सिनेमांच्या तुलनेत फार कमी आहे. सलमान खान स्टारर ‘भारत’ सिनेमाने पहिल्यादिवशी तब्बल ४३.३० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. ‘भारत’ सिनेमा देखील ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे ‘किसी का भाई किसी की जान’ येत्या दिवसात किती कमाई करेल आणि शनिवार, रविवार असल्याचा भाईजानला फायदा होणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात सलमान खान याने ‘भाईजान’ या भूमिकेला न्याय दिला आहे. सिनेमात सलमान प्रेयसीसाठी गुंडासोबत लढत असल्याचं दिसत आहे. सिनेमात सलमान, अभिनेत्री पूजा हेगडे यांच्यासोबत सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवरी महत्त्वाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. सिनेमाला चाहते आणि विश्लेषकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Non Stop LIVE Update
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्...
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्....
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता..
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता...
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण.
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक.
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी.
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला.
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ.
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.