
कपूर घराणं आज बॉलिवूडमध्ये एक नावाजलेलं घराणं आहे जे पिढ्यांपिढ्या चित्रपटसृष्टीत काम करतंय. पृथ्वीराज कपूरपासून रणबीर कपूरपर्यंत, कुटुंबाच्या सर्व पिढ्या हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडल्या गेल्या आहेत आणि बॉलिवूडला अधिक उंचीवर नेण्यात प्रत्येकाने योगदान दिले आहे.
या सुनेनं कपूर घराण्याचा तो कडक नियम मोडला
पण सुरुवातीला कपूर घराण्यात काही नियम होते त्यापैकी एक फारच नियम होता तो म्हणजे कपूर घराण्यातील कोणत्याही सुनेने आणि मुलींदेखील लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही.पण घरात एक अभिनेत्री सून म्हणून आली पण तिने हा नियम मोडला अन् पुढच्या पिढीची अभिनयात येण्यासाठी मदत केली. ही सून म्हणजे बबिता.
लग्नानंतर स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले
बबिता ही बॉलिवूडची एक अतिशय हुशार अभिनेत्री. त्यांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर ती एका चित्रपट कुटुंबाचा भाग बनली असे अनेकांना वाटते पण हे खरे नाही, त्यांचा जन्मही एका चित्रपट कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील हरी शिवदासानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक पात्र अभिनेता होते.
चित्रपटांमध्ये काम करत असताना बबिता रणधीर कपूर यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी त्या त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होत्या 1971 नंतर त्यांनी चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. पण फक्त बबिताच नाही तर अभिनेत्री नीतू कपूर देखील लग्नापूर्वी त्यांच्या काळातील स्टार होत्या, परंतु कपूर कुटुंबाशी संबंध येताच त्या पडद्यावरून गायब झाल्या.
कपूर कुटुंबाच्या नियमांविरुद्ध आवाजही उठवला
नंतर मात्र बबिता यांनी कपूर कुटुंबाच्या नियमांविरुद्ध आवाजही उठवला. एवढंच नाही तर, लग्नानंतर काही काळाने बबिता आणि रणधीर कपूर वेगळे झाले. पण त्यांचा कधीही घटस्फोट झाला नाही. बबिता यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना एकट्याने वाढवले. बबिता यांना तर लग्नानंतर पुन्हा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांना त्यांच्या मुलींना म्हणजे करीना आणि करिश्माला मात्र या बंधनात अडकू द्यायचं नव्हतं. बबिता यांनी हा नियम मोडण्याचं मुख्य कारण म्हणजे अर्थात त्यांच्या मुली होत्या.
त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता
पण बबितासाठी हा प्रवास इतका सोपा नव्हता कारण करीश्मा कपूर ही कपूर घराण्याची पहिली मुलगी होती जी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार होती पण तिला तिच्या आई बबिता आणि वडील रणधीर कपूर यांच्याकडूनही पाठिंबा मिळाला. जेव्हा करिश्माने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा मात्र कपूर घराण्यातील सुना आणि मुलींसाठी अभिनयाचा मार्ग मोकळा झाला. या सर्व गोष्टींवर करीनाने एका मुलाखतीत भाष्य केलं. करीनाने हे देखील सांगितले की करीश्मा आणि तिला आई-वडिलांनी कायम पाठिंबा दिला आहे. जेणेकरून ते चित्रपट क्षेत्रात करिअर करू शकतील.