Sathyaraj: राजीव गांधींच्या हत्येतील दोषीसोबत ‘बाहुबली’च्या ‘कटप्पा’चा डान्स; कार्यक्रमात अनेक नेतेही झाले सहभागी

राजीव गांधी (Rajiv Gandhi) हत्येचा दोषी पेरारिवलनच्या (A. G. Perarivalan) माध्यमातून आयोजित एका कार्यक्रमात 'बाहुबली'चा 'कटप्पा' म्हणजेच सत्यराज उपस्थित होते. इतकंच नव्हे तर त्यांनी पेरारिवलनसोबत स्टेजवर जबरदस्त डान्ससुद्धा केला.

Sathyaraj: राजीव गांधींच्या हत्येतील दोषीसोबत बाहुबलीच्या कटप्पाचा डान्स; कार्यक्रमात अनेक नेतेही झाले सहभागी
Sathyaraj: राजीव गांधींच्या हत्येतील दोषीसोबत 'बाहुबली'च्या 'कटप्पा'चा डान्स
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 10:51 AM

‘बाहुबली’मध्ये ‘कटप्पा’ची भूमिका साकारून रातोरात सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे अभिनेते सत्यराज (Sathyaraj) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. यामागचं कारण म्हणजे राजीव गांधी (Rajiv Gandhi) हत्येचा दोषी पेरारिवलनच्या (A. G. Perarivalan) माध्यमातून आयोजित एका कार्यक्रमात ‘बाहुबली’चा ‘कटप्पा’ म्हणजेच सत्यराज उपस्थित होते. इतकंच नव्हे तर त्यांनी पेरारिवलनसोबत स्टेजवर जबरदस्त डान्ससुद्धा केला. पेरारिवलनने आपल्या आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात अनेक नेतेही सहभागी झाले होते.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा दोषी ठरलेल्या पेरारिवलनने त्याची आई अर्पुथम्मल आणि वडील कुयिल दासन यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याने अनेक नेत्यांनाही वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात ‘बाहुबली’ फेम सत्यराजसुद्धा सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये सत्यराज हे डान्स करताना दिसत आहेत आणि यादरम्यान त्यांच्यासोबत स्टेजवर इतरही लोक नाचताना पहायला मिळत आहेत.

पहा व्हिडीओ-

राजीव गांधी हत्येचा दोषी पेरारिवलन हा 30 वर्षे तुरुंगात होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटका केली. पेरारिवलनची तुरुंगातील लोकांशी असलेली चांगली वागणूक वाहून सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिल्याचं म्हटलं होतं. पेरारिवलनला सर्वोच्च न्यायालयाने 9 मार्च रोजी जामीन मंजूर केला होता.