अभिनेत्रीने स्वतःचं जीवन संपवल्यानंतर बॉयफ्रेंड म्हणतो, ‘तिच्या वडिलांनीच तिला…’

LOVE LIFE | मरके भी माही तुझसे मुँह न मोडना...’ असं स्टेटस ठेवत अभिनेत्री स्वतःचं आयुष्य संपवलं तेव्हा..., अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड म्हणतो, 'तिच्या वडिलांनीच तिला...', सर्वत्र बॉयफ्रेंडच्या वक्तव्याची चर्चा...

अभिनेत्रीने स्वतःचं जीवन संपवल्यानंतर बॉयफ्रेंड म्हणतो, तिच्या वडिलांनीच तिला...
फाईल फोटो
| Updated on: Jul 20, 2025 | 3:50 PM

LOVE LIFE | आताच्या काळात सोशल मीडियावरील स्टेटसवरुन समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय सुरु आहे, याचा अंदाज बांधला जातो.. दरम्यान, झगमगत्या विश्वातील एका अभिनेत्रीने देखील आयुष्यातील खास व्यक्तीसाठी व्हॅट्स ऍपवर स्टेटस ठेवलं आणि स्वतःचं आयुष्य संपवलं… ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘बालिका वधू’ मालिकेत आंनदीच्या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री प्रत्यूषा बनर्जी होती. तिच्या निधनाला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रत्यूषाच्या निधनानंतर बॉयफ्रेंड राहुल राज सिंह याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पण आता राहुल राज सिंह याने अभिनेत्रीच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राहुल राज सिंह याने धक्कादायक खुलासा केला आहे. राहुल राज सिंह म्हणाला, ‘प्रत्युषा बनर्जी हिला दारू प्यायची सवय होती. मी तिला अनेकदा सांगितलं होतं दारु सोडून दे, पण तिने माझं कधीच ऐकलं नाही. तिला टीव्ही विश्वात काम देखील करायचं नव्हतं, ती स्वतःमध्ये हरवलेली असायची…’

राहुलला विचारण्यात आलं की, प्रत्युषा हिला दारूचं व्यसन होतं… असा दावा अनेकदा करण्यात आला आहे. यावर राहुल राज म्हणाला, प्रत्युषा आधीच दारू पित होती. तिचे वडीलच तिला दारू पाजत असायचे. माझ्या आयुष्यात येण्यापूर्वीत प्रत्युषा हिला दारुचं व्यसन होतं. इंडस्ट्रीमधील असल्यामुळे स्वतःला फिट ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं. पण प्रत्युषाला त्याची काळजी नव्हती…

‘प्रत्युषा तिच्या वडिलांसोबत प्रचंड फ्रेंडली होती. दारु प्यायल्यानंतर तिचे वडील गुंड व्हायचे… त्यानंतर बाप आणि लेकीमध्ये भांडणं देखील व्हायची… प्रत्युषाचं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी मी अनेकांसोबत संपर्क देखील केलेला. पण तिने माझं कधीच ऐकलं नाही…’

‘मृत्यू आधी आमचं फोनवर बोलणं झालं होतं. ती मला धमकी देत होती. तेव्हा मी तिला सांगितलं की, मी येईपर्यंत काहीही करु नकोस…’ असं देखील राहुल राज सिंह म्हणाला. एवढंच नाही तर डिप्रेशनमध्ये असल्यामुळे अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.

बालिका वधू’ मालिकेत आनंदी ही भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली होती. बिग बॉसमध्ये देखील अभिनेत्री दिसली होती. पण जेव्हा तिच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा चाहत्यांसह संपूर्ण झगमगत्या विश्वाला मोठा धक्का बसला..