
उर्वशी रौतेलाच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. उर्वशीनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच तिच्या सौंदर्याचं कौतुक होतंय. तिनं मॉडेलिंगमध्येही आपला ठसा उमटवला आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहिती असेल की उर्वशी एक खेळाडूसुद्धा आहे.

उर्वशी ही राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू आहे. एवढंच नाही तर उर्वशीनं बास्केटबॉलशिवाय इतरही अनेक खेळ खेळले आहेत. ती व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी देखील खेळली आहे.

11 डिसेंबर 2017 रोजी एका वृत्तसंस्थेशी बोलताना उर्वशी म्हणाली, "राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलपटूव्यतिरिक्त मी व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी असे इतर खेळही खेळले आहेत."

एकदा कपिल शर्मा शोमध्येही तिने याची कबुली दिली होती. यानंतर ती मॉडेलिंगमध्ये आली. अगदी लहान वयातच तिने मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवलं.

उर्वशीनं वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. विल्स लाइफस्टाईल इंडिया फॅशन वीकमध्ये तिला पहिला मोठा ब्रेक मिळाला.

2009 मध्ये ती मिस टीन इंडिया देखील ठरली आहे.

2011 मध्ये तिनं मिस टुरिझम क्वीन ऑफ दी इयरचा किताब जिंकला. 2015 मध्ये तिनं मिस युनिव्हर्स इंडियामध्ये प्रवेश केला आणि विजेतेपद जिंकलं. त्याच वर्षी तिनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं.

मॉडेलिंगच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पोहोचली. 2013 मध्ये तिनं ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर तिनं सनम रे (2016), ग्रेट ग्रँड मस्ती (2016), काबिल (2017), हेट स्टोरी 4 (2018) सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली.

याशिवाय ती अनेक म्युझिक अल्बममध्येही दिसली आहे, त्यापैकी हनी सिंगसोबत तिचा अल्बम 'लव डोस' हा सर्वात प्रसिद्ध अल्बम आहे.