
प्रसिद्ध बंगाली अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर मनोरंजन जगताला धक्का बसला आहे.४३ वर्षीय अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी ओडीशातील दीघा येथे टीव्ही मालिका ‘भोले बाबा पार करेगा’ चे चित्रिकरणात बिझी असताना हा दु:खद अपघात घडला.ओडीशा येथील तलसारी बिचवर शुटींग करत असताना ते समुद्राच्या पाण्यात उतरले आणि काही क्षणातच ते पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी तंत्रज्ञ धावले आणि त्यांना पाण्याबाहेर काढण्यातही आले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
पाण्यात बुडल्याने त्यांचा मृ्त्यू झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांना दीघा येथील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासण्याआधीच त्यांचा मृ्त्यू झाला होता. संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी तलसारी येथे गेली होती. ‘आनंद बाजार पत्रिके’तील वृ्त्तानुसार त्यांचा मृत्यू समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने झाला आहे. ही एक दु:खद घटना आहे. ही घटना शुटींग संपल्यानंतर ( पॅकअप ) घडली. मात्र, नेमका हा अपघात कसा झाला हे कळू शकलेले नाही. काही जणांच्या मते काही चाहते त्यांचा सेल्फी घेत होत. परंतू सायंकाळी चार नंतर अचानक समुद्राचे पाणी वाढल्याचे सांगितले जाते.
शुटींग संपल्यानंतर टीम लंचसाठी निघून गेली होती. मात्र, राहुल यांनी तेथे थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी म्हटले होते की ते टीमसोबत सामील होण्यापूर्वी काही उरलेले शॉट्स पूर्ण करतील. परंतू याच्या नंतर जे घडले त्याची कल्पना कोणीच केली नसेल.
बंगाली अभिनेत्याचा अशा प्रकारे कमी वयात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शुटींग करता करता पाण्यात उतरले आणि राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचा अचानक असे झालेले निधन हे त्यांचे सहकलाकार, चाहते आणि संपूर्ण मनोरंजन जगताला मोठा हादरा आहे. एक प्रतिभावंत कलाकार गमावल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.