
बॉलिवूड असो किंवा भोजपुरी इंडस्ट्री यामधील कोणता कलाकार कधी काय करेल याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. सध्या असाच एक प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या अभिनेत्याने तिसरं लग्न केल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्याच्या दुसऱ्या विवाहाचा घटस्फोट अद्याप कायदेशीररित्या झालेला नाही देखील सांगण्यात येत आहे.
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव पवन सिंह आहे. ते भाजपचे नेते आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत याआधीही अनेक वाद, आरोप आणि अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात अभिनेत्रीशी केलेल्या अयोग्य वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हजारो प्रेक्षकांसमोर अभिनेत्रीच्या कंबरेत हात ठेवल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका देखील झाली होती.
व्हायरल व्हिडिओनंतर वैवाहिक वाद
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पवन सिंह यांच्या दुसऱ्या पत्नीने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. तिने घटस्फोट देण्यास नकार देत लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. सध्या दोघांमधील घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत पवन सिंह यांनी तिसरं लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्याने हा विषय अधिकच चर्चेत आला आहे.
नुकताच पवन सिंह यांनी आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पवन सिंह केक कापताना दिसत आहेत. ते दारूच्या नशेत असल्याचाही दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कारण या व्हिडीओमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते एका महिलेने.
व्हिडिओमध्ये दिसणारी ती महिला कोण?
या महिलेचा नवरीसारख्या अवतार पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तिच्या भांगात कुंकू भरलेलं स्पष्टपणे दिसत आहे. ती महिला पवन सिंह यांना केक कापण्यात मदत करतानाही दिसते आहे. याच कारणामुळे पवन सिंह यांनी गुपचूप तिसरं लग्न केल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पवन सिंह यांच्यासोबत दिसणारी महिला म्हणजे भोजपुरी अभिनेत्री महिमा सिंग असल्याचं सांगितलं जात आहे.