Bigg Boss 20 : जन्नत झुबैर, माही विजसह अनेक बड्या नावांची चर्चा…, यावेळी घर पूर्णपणे असेल वेगळा, मोठी अपडेट समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस 20' शोबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळी शोमध्ये जन्नत झुबैर, माही विज.. यांसरख्या बड्या सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत, तर सोशल मीडियास्टार देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. तर घराबद्दल देखील मोठी अपडेट समोर आली आहे.

Bigg Boss 20 : जन्नत झुबैर, माही विजसह अनेक बड्या नावांची चर्चा..., यावेळी घर पूर्णपणे असेल वेगळा, मोठी अपडेट समोर
Bigg Boss 20
| Updated on: Jul 28, 2026 | 11:30 AM

Bigg Boss 20 : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस 20’ शोचा प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, शो सप्टेंबर पासून सुरु होत आहे. जशी जशी शोच्या प्रीमियरची तारीख जवळ येत आहे, तशी तशी प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोच्या स्पर्धकांची नावे देखील समोर येत असून, घर यावेळी कसं असेल… याबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे. सध्या अभिनेत्री जन्नत झुबैर आणि अभिनेत्री माही विज यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर जाणून घ्या बिग बॉसचा यंदाचा सिझन का खास ठरणार आहे? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 20’ शोची चर्चा सुरु आहे.

बड्या सेलिब्रिटींची नावे स्पर्धक म्हणून चर्चेत…

मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी जन्नत झुबैर, माही विज, गीता बसरा, कॉमेडियन सुनील पाल आणि कटेंट क्रिएटर शोइक चक्रवर्ती यांची नावे चर्चेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांसोबत चर्चा अंतिम टप्प्यावर आली आहे. जर सर्वकाही ठरल्याप्रमाणे झालं तर, सेलिब्रिटी शोसाठी होकार देतील आणि बिग बॉसच्या दिसतील… पण यावर निर्मात्यांनी अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.

एवढंच नाही तर, सोशल मीडिया विश्वातील अनेक लोकप्रिय चेहरेही ‘बिग बॉस 20’ मध्ये सहभागी होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, मिस्टर फैसू, फैज बलोच, भाव्या सिंग, मॅक्सटर्न आणि दुष्यंत कुकरेजा यांची नावेही निर्मात्यांच्या यादीत आहेत. मात्र, यापैकी कोणीही अद्याप शोमधील सहभागाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

बिग बॉसच्या घरात होणार मोठे बदल…

‘बिग बॉस 20’ मध्ये केवळ स्पर्धकच नाही, तर खुद्द ‘बिग बॉस’चे घर देखील वेगळ्या रूपात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’च्या घराची रचना करणारे ओमुंग कुमार या वेळी या शोचा भाग नसतील. त्याऐवजी, The 50 या शोचा सेट डिझाइन करणाऱ्या कांचन आणि रूपाली या दोघी या सीझनसाठी ‘बिग बॉस’च्या नवीन घराची रचना करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 20’चा भव्य प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच, टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वी हा शो सर्वप्रथम ‘जिओ-हॉटस्टार’वर (JioHotstar) स्ट्रीम केला जाईल. याचा अर्थ असा की, या ‘डिजिटल-फर्स्ट’ फॉरमॅटमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us