
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहेत. मागे एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात वाद सुरू असून दोघे लवकरच विभक्त होणार आहेत. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. मात्र, त्यादरम्यानच ऐश्वर्या राय ही अभिषेकसोबत फार जास्त फिरताना दिसली नाही. हेच नाही तर ऐश्वर्या ही मुलगी आराध्या हिच्यासोबतच विदेशात जात होती. आराध्या बच्चन हिच्या शाळेतील एका कार्यक्रमाला अख्ख्ये बच्चन कुटुंबिय एकत्र दिसले. यावेळी अभिषेकबच्या गाडीमधून जाताना ऐश्वर्या दिसली आणि घटस्फोटाच्या चर्चा या फक्त अफवाच असल्याचा अंदाज लोकांनी लावला.
ऐश्वर्या राय हिच्यानंतर अभिषेक बच्चन हा देखील कोर्टात गेल्याचे बघायला मिळाले. अभिषेकला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी अभिषेक बच्चनने याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी झालीये. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अभिनेत्याचे नाव, फोटो आणि आवाज त्याच्या परवानगीशिवाय वापरण्यास आता थेट बंदी घातली आहे. अशाच प्रकारची एक याचिका ऐश्वर्या राय हिने देखील दाखल केली होती.
अभिनेत्याच्या बेकायदेशीर एआय जनरेटेड फोटो वापरण्यास आता बंदी घालण्यात आली. न्यायमूर्ती कारिया यांनी त्यांच्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले की, अभिषेक बच्चन यांनी दिलेले युक्तिवाद आणि पुरावे आम्ही पाहिले. पहिल्या दृष्टीक्षेपात त्यांचा युक्तिवाद खूप मजबूत नक्कीच वाटला आहे. अभिषेकने त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली.
फक्त अभिषेक हाच नाही तर काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय हिने देखील अशाचप्रकारची एक याचिका कोर्टात दाखल केली होती. ऐश्वर्यानंतर आता कोर्टाने अभिषेकलाही दिलासा दिल्याचे बघायला मिळतंय. अभिषेक बच्चन हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. तो चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करतो. मात्र, पत्नी ऐश्वर्या हिच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल अभिषेकने कधीही भाष्य केले नाही.