दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर, …म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी

दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी याचिका दाखल करून गंभीर आरोप केले आहेत. तर दिशा सालियन प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे... काही कारणांमुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे..

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर, ...म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी
Disha Salian
| Updated on: Dec 12, 2025 | 9:50 AM

Disha Salian Death Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवालांशिवाय कोणताही आदेश देता येणार नाही…. असं न्यायालयाने सांगितलं आहे.

प्रकरणातील पुरावे नव्याने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हे लक्षात घेऊन न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत सर्व अहवाल तपासल्यानंतरच पुढील आदेश देण्यात येतील असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

रिपोर्टनुसार, दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी याचिका दाखल करून गंभीर आरोप केले. दिशावर सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तर गुन्हा तात्काळ नोंदवावा, तपास सीबीआयकडे द्यावा, काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रकरण झाकण्याचं काम सुरु आहे… असा देखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

खंडपीठ न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांनी सांगितल्यानुसार, ‘याचिकेवरील प्राथमिक मत तयार करण्यासाठीही आम्हाला सर्व वैद्यकीय अहवाल पाहणं आवश्यक आहे.” सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी सांगितल्यानुसार, आम्ही फक्त FIR मागत आहोत; या टप्प्यावर शवविच्छेदन अहवाल आवश्यक नाही” अशी बाजू मांडली.

मात्र खंडपीठाने स्पष्ट शब्दात स्पष्टीकरण दिलं की, ‘शवविच्छेदन अहवाल अत्यावश्यक आहे आणि तो पाहिल्याशिवाय पुढील निर्णय देता येणार नाही….. याचिकाकर्त्यांना सुधारित याचिका करण्याची परवानगी दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल एका आठवड्यात जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अखेर काय आहे प्रकरण?

दिशा सालियन प्रकरण हे हाय – प्रोफाईल प्रकरण आहे. 8 जून 2020 मध्ये दिशा हिचा मृत्यू झाला. मलाड येथील उच्चभ्रू इमारतीवरून पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सुरुवातीला दिशाची आत्महत्या ठरवून अपघाती मृत्यूचा अहवाल (ADR) दाखल केला. पण या घटनेनंतर अनेक प्रश्न समोर आले. त्यामुळे प्रकरण अधिक जटिल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरण बनलं आहे.