Sidharth Shukla: हुबेहूब सिद्धार्थ शुक्लाच! व्हिडीओ पाहून चाहत्यांना आली दिवंगत अभिनेत्याची आठवण

| Updated on: Jan 17, 2023 | 1:19 PM

हुबेहूब सिद्धार्थसारख्या दिसणाऱ्या या तरुणाचं नाव चंदन आहे. त्याचा चेहरा-मोहरा, अभिनयाचा आणि डायलॉग बोलण्याचा अंदाज हा अगदी सिद्धार्थसारखाच आहे. विशेष म्हणजे खुद्द चंदनसुद्धा सिद्धार्थचा खूप मोठा चाहता आहे.

Sidharth Shukla: हुबेहूब सिद्धार्थ शुक्लाच! व्हिडीओ पाहून चाहत्यांना आली दिवंगत अभिनेत्याची आठवण
Sidharth Shukla
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत आजही असंख्य चाहते सोशल मीडियावर पोस्ट आणि फोटो शेअर करत असतात. सिद्धार्थ हा ‘बिग बॉस 13’चा विजेता ठरला होता. बिग बॉसच्या घरात शहनाज गिलसोबतच्या त्याच्या मैत्रीने चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. या दोघांना ‘सिडनाज’ असं नावंच देण्यात आलं होतं. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो हुबेहूब सिद्धार्थसारखाच दिसत असल्याचे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

हुबेहूब सिद्धार्थसारख्या दिसणाऱ्या या तरुणाचं नाव चंदन आहे. त्याचा चेहरा-मोहरा, अभिनयाचा आणि डायलॉग बोलण्याचा अंदाज हा अगदी सिद्धार्थसारखाच आहे. विशेष म्हणजे खुद्द चंदनसुद्धा सिद्धार्थचा खूप मोठा चाहता आहे. इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ शेअर करत तो सिद्धार्थची आठवण काढताना दिसतो. चंदनचे काही व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना सिद्धार्थची आठवण येत आहे. चंदनने सिद्धार्थचे हावभाव आणि ॲक्शन्सना जसंच्या तसं कॉपी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘भावा, तू व्हायरल होणार हे नक्की’ असं एका युजरने लिहिलं. तर ‘हुबेहूब सिद्धार्थ शुक्लाच’ असं दुसऱ्याने म्हटलं आहे. ‘एका क्षणासाठी मला वाटलं हा सिद्धार्थ शुक्लाच आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं होतं. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थचं निधन झालं होतं. सिद्धार्थ मूळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. त्याला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचं खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये आईच्या सांगण्यावरून सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचा लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.