AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 15 | सलमानच्या ‘बिग बॉस’च्या घरात तुम्हालाही मिळू शकते एंट्री, वाचा प्रक्रिया आणि जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख…

गेल्या सीझनपेक्षा आता येणारा ‘बिग बॉस’चा सिझन थोडा वेगळा असणार, कारण या सीझनमध्ये सेलिब्रिटींबरोबरच सामान्य जनतादेखील या कार्यक्रमाचा भाग बनू शकते.

Bigg Boss 15 | सलमानच्या ‘बिग बॉस’च्या घरात तुम्हालाही मिळू शकते एंट्री, वाचा प्रक्रिया आणि जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख...
बिग बॉस 15
| Edited By: | Updated on: Mar 16, 2021 | 9:57 AM
Share

मुंबई : ‘बिग बॉस’ हा असा एक कार्यक्रम आहे की, लोक त्याचा द्वेष करू शकतात किंवा त्यावर भरभरून प्रेम देखील करू शकतात. परंतु, कोणत्याही परिस्थितीत ते या शोकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत आणि म्हणूनच मागील 14 वर्षांपासून या शोची लोकप्रियता अबाधित आहे. अलीकडेच ‘बिग बॉस 14’चा (Bigg Boss) प्रवास पूर्ण झाला असून, निर्मात्यांनी 15व्या सीझनची तयारी सुरू केली आहे. गेल्या सीझनपेक्षा आता येणारा ‘बिग बॉस’चा सिझन थोडा वेगळा असणार, कारण या सीझनमध्ये सेलिब्रिटींबरोबरच सामान्य जनतादेखील या कार्यक्रमाचा भाग बनू शकते. याचाच अर्थ असा की, तुम्ही देखील ‘बिग बॉस 15’च्या घरात जाऊ शकता, परंतु यासाठी आपल्याला आपले ऑडिशन सबमिट करावे लागेल (Bigg Boss 15 update common people can participate in bigg boss house know details).

आपल्याला जर ‘बिग बॉस’च्या या पर्वात सहभागी व्हायचे असेल, तर व्हूटचा (Voot) आधार घ्यावा लागेल. आपण आधीपासून व्हूट अ‍ॅप वापरत नसल्यास प्रथम आपल्याला व्हूट अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. डाऊनलोड केल्यानंतर आपण स्वत: साईन अप करू शकता. या ऑडिशनसाठी आपले वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. व्हूट अॅपवर आपल्याला एक ऑनलाइन फॉर्म मिळेल. जिथे आपल्याला आपले नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी भरावा लागेल.

एक व्हिडीओ अपलोड करणे आवश्यक!

ऑडिशनसाठी, आपल्याला तेथे स्वतः एक व्हिडीओ अपलोड करावा लागेल. हे लक्षात ठेवा की, हा व्हिडिओ मनोरंजक असला पाहिजे आणि व्हिडीओ 5 मिनिटांपेक्षा तसेच 50MB पेक्षा मोठे नसावेत. आपण Avi, Mov, Mp4 स्वरूपात व्हिडीओ अपलोड करू शकता. व्हिडीओ अपलोड करण्याची अट अशी आहे की, आपला चेहरा या व्हिडीओमध्ये स्वच्छ आणि पूर्ण दिसावा. तसेच, त्यामध्ये कोणतेही पार्श्व संगीत असू नये (Bigg Boss 15 update common people can participate in bigg boss house know details).

‘ही’ आहे शेवटची तारीख

बिग बॉससाठी नोंदणी आणि ऑडिशनची ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. परंतु, ही ऑडिशन केवळ 30 मार्चपर्यंत खुली आहेत, नंतर ही प्रक्रिया पुढे पूर्ण केली जाईल. आमच्या माहिती स्त्रोतानुसार आतापर्यंत हजारो लोकांनी या अ‍ॅपवर ऑडिशनसाठी नोंदणी केली आहे.

सेलिब्रिटीजही होतील सहभागी

सामान्य जनता सहभागी होऊ शकणाऱ्या या ‘बिग बॉस 15’मध्ये निर्माते टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांना सहभागी करून घेण्याची योजना आखत आहेत. यामध्ये शशांक व्यास, आकांक्षा पुरी, निया शर्मा आणि जेनिफर विगेट अशी अनेक नावे समोर आहेत. आमच्या सूत्रांनुसार, बिग बॉसच्या 15व्या हंगामासाठी निकितन धीर, अदा खान, अभिजीत सावंत, निखिल चिंपा, अंकिता लोखंडे, तेजस्वी प्रकाश, मोहित मलिक, शरद मल्होत्रा, एरिका फर्नांडिस आणि रक्षादास खान ही नवे चर्चेत. तथापि, अद्याप कोणत्याही नावाची पुष्टी झालेली नाही.

(Bigg Boss 15 update common people can participate in bigg boss house know details)

हेही वाचा :

Govinda | ‘मीसुद्धा घराणेशाहीचा बळी ठरलो होतो’, रुपेरी पडद्यापासून दूर असणाऱ्या गोविंदाच्या संतापाचा उद्रेक!

कचरा वेचणाऱ्या भावांना मिळाली ‘इंडियन आयडॉल’मध्ये गाण्याची संधी, लोकांनी केले तोंड भरून कौतुक!

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.