
Shiv Thakare : ‘बिग बॉस 16’ शोचा फर्स्ट रनरअप शिव ठाकरे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या शिव याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शिव नवऱ्या मुलाच्या रुपात दिसत आहे. बाजूला नवरी मुलगी दिसत आहे. खुद्द शिव याने फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत शिव याने कॅप्शनमध्ये ‘फायनली…’ असं लिहिलं आहे… पण शिव याने खरंच लग्न केला आहे का? अशा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शिव ठाकरे याने 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये शिव याच्यासोबत एक तरुणी देखील दिसत आहे. पण तिचा चेहरा दिसत नाही. तर त्यांच्या भोवती नातेवाईक आणि लग्नमंडपातील सजावट दिसत आहे… फोटो पाहिल्यानंतर असं वाटत आहे की, शिव याने मराठी परंपरेनुसार लग्न केलं… फोटो व्हायरल झाल्यानंतर आश्चर्य व्यक्त करत अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
शिवने हा फोटो शेअर करताच अभिनंदनाचा वर्षाव झाला. भारती सिंगने लिहिलं, “भाऊ, हे कधी घडलं? अभिनंदन.” भारती हिच्याशिवाय अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन, आकांक्षा पुरी, ऐश्वर्या शर्मा, जेमी लिवर यांच्यासह अनेकांनी शुभेच्छांचा वर्षावर केला…
अनेकांनी फोटो पाहिल्यानंतर प्रश्न उपस्थित केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘हे खरं आहे की शुटिंग आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हे शुटिंग दरम्यानचं आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘एप्रिल येण्याची वेळ झाली आहे…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिव ठाकरे आणि त्याने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
शिवने मुंबईत चहा आणि स्नॅक्सचं रेस्टॉरं सुरु केलं आहे. त्याने “बी. रियल” नावाचा डिओडोरंट ब्रँड देखील लाँच केला आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, त्याचे 2.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. अभिनेता कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो.