AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 : ईशाने अभिषेकला मारली मिठी, म्हणाली, ‘मला माफ कर, आता आपलं…’

Bigg Boss 17 : ईशाने सर्वांसमोर का मागतली एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमार याची माफी? जाता - जाता म्हणाली, 'मला माफ कर, आता आपला...', सध्या सर्वत्र ईशा आणि अभिषेक यांच्या नात्याची चर्चा... ईशाला पाहून अभिषेक का झाला भावुक...

Bigg Boss 17 : ईशाने अभिषेकला मारली मिठी, म्हणाली, 'मला माफ कर, आता आपलं...'
| Updated on: Jan 22, 2024 | 1:25 PM
Share

मुंबई | 22 जानेवारी 2024 :बिग बॉस 17′ सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील बिग बॉस स्पर्धकांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ‘बिग बॉस 17’ शो आता अंतिम टप्प्यात आहे. ‘बिग बॉस 17’ शोचा विजेता कोण होणार? अशी चर्चा सुरु असताना ईशा मालवीय शोतून बाहेर झाली आहे. ईशा एव्हिक्ट झाल्यामुळे अभिषेक कुमार भावुक होतो…. एवढंच नाही तर, ईशा हिने सर्वांसमोर एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमार याची माफी देखील मागितली.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा आणि अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

‘बिग बॉस 17’ मधून एव्हिक्ट झाल्यानंतर ईशा, अभिषेक जवळ जाते आणि म्हणते ‘तुला शुभेच्छा…! तू म्हणाला होतास तुला टनल पर्यंत सोडायला येईल… चला आता मला सोड… तू चांगलं करत आहेस… आणखी चांगलं कर… ऑल द बेस्ट…’ ईशा हिचं बोल ऐकून अभिषेक याच्या डोळ्यात पाणी येतं…

पुढे अभिषेक याला मिठी मारत ईशा म्हणाली, ‘तू आता चांगला खेळ खेळ…’ यावर अभिषेक म्हणाला, ‘तु जायाला हवं… अशी माझी बिलकूल इच्छा नाही… तुला असं वाटयचं, पण माझ्या मनात कधीच अस नव्हतं…’, ईशा म्हणाली, ‘काही हरकत नाही… मी प्रत्येक गोष्टीसाठी तुझी माफी मागते…’

‘आपल्यामध्ये जे काही होतं, ते आता संपलं आहे. आता मी तुला कधीच वाईट समजणार नाही, वाईट बोलणार नाही… ऑल द बेस्ट…’ टनल पर्यंत पोहोचल्यानंतर ईशा रडू लागते… ‘फिनालेपर्यंत येऊन मला माघारी जावं लागत आहे… यासाठी मला प्रचंड वाटत आहे…’ ईशा ‘बिग बॉस 17’ मधून बाहेर गेल्यानंतर अभिषेक कॅमेऱ्यासमोर येतो आणि म्हणतो, ‘तू गेल्यामुळे मला वाईट वाटत आहे. माझ्या मनात आता तुझ्यासाठी भावना नाहीत. पण तू टॉप-5 मध्ये असायला हवी होतीस… पण तू तुझ्या आयुष्यात फार पुढे जाशील…अशी मला खात्री आहे…’

‘उडारिया’ मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली ईशा हिने ‘बिग बॉस 17’ मध्ये देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘बिग बॉस 17’ मध्ये समर्थ जुरेल याच्या सोबत असलेल्या नात्यामुळे ईशा हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दोघांचे अनेक रोमाँटिक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांच्या नात्याला ईशा हिच्या कुटुंबियांचा विरोध होता. तर, समर्थ याच्या वडिलांनी मात्र, मला काहीही हरकत नाही… दोघांनी पुढे जाऊन कोणता निर्णय घेतला, तर मी त्यांच्या सोबत आहे… असं म्हणाले होते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच