AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’बद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे, सलमान खान शोमध्ये…

बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी उत्सुकता बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये टीव्हीचे अनेक फेमस चेहरे हे सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. बिग बॉस 17 मध्ये सीमा हैदर ही सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

Bigg Boss 17 | 'बिग बॉस 17'बद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे, सलमान खान शोमध्ये...
| Updated on: Oct 04, 2023 | 4:16 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 तूफान चर्चेत आहे. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. नुकताच आता बिग बाॅस ओटीटी 2 हे पार पडलंय. बिग बाॅस ओटीटी 2 ने मोठी धमाल केली. बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) चा विजेता एल्विश यादव हा ठरलाय. बिग बाॅस ओटीटी 2 संपल्यापासून चाहते हे सतत बिग बॉस 17 वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची लिस्ट व्हायरल झाली. यावेळी टीव्हीचे काही फेमस चेहरे बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसतील.

गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत असलेली सीमा हैदर आणि सचिन मीना हे बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सीमा हैदर ही आपल्या प्रेमासाठी थेट पाकिस्तानमधून नेपाळ मार्गे भारतात दाखल झालीये. सीमा हैदर सतत चर्चेत आहे. सीमा हैदर हिने स्पष्ट केले की, बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी तिच्यासोबत संपर्क साधलाय.

बिग बॉस 17 ला सलमान खान हा होस्ट करताना दिसले. सध्या सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपट टायगर 3 मध्ये व्यस्त आहे. टायगर 3 चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ ही मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसले. बऱ्याच वर्षांनंतर कतरिना कैफ आणि सलमान खान यांची जोडी स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचे चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.

टायगर 3 चित्रपटासोबतच सलमान खान हा बिग बॉस 17 च्या तयारीला लागलाय. बिग बॉस 17 चा प्रोमो नुकताच सलमान खान याने शूट केल्याचे सांगितले जातंय. यावेळी भगव्या रंगाचा खास कुर्ता घातला असून त्यावर हाफ जॅकेट देखील सलमान खान याने घातल्याचे सांगितले जातंय. सोशल मीडियावर सलमान खान याच्या या लूकचे काही फोटो व्हायरल होताना दिसतायंत.

काही दिवसांपूर्वीच चर्चा रंगताना दिसली की, सलमान खान हा बिग बॉस 17 होस्ट करताना दिसणार नाहीये. यानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने सलमान खान शो होस्ट करणार नसल्याचे सांगितले गेले. आता सलमान खान याने बिग बॉस 17 चा प्रोमो शूट केल्याने हे स्पष्ट आहे की, तोच बिग बॉस 17 होस्ट करताना दिसेल.

Follow Us
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर