बिग बॉसची सुंदर स्पर्धक सलमान खानवर भाळली, सल्लूभाईच्या फ्लॅटवर राहायला तयार; प्रकरण काय?
बिग बॉस 19 पर्वातील सर्वात सुंदर स्पर्धक आता सलमान खानवर भाळली आहे. बिग बॉस संपला की मी तुमच्याच घरी राहायला येणार, असे ही स्पर्धक थेट सलमान खानला म्हणाली आहे.

Bigg Boss Grand Finale : पेक्षा जास्त काळ चालले. या सिझनचा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी पार पडला असून गौरव खन्ना याने या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टॉप फाईव्ह स्पर्धकांमध्ये मराठमोळा प्रणित मोरे हादेखील होता. परंतु त्याला ट्रॉफीला गवसणी घातला आली नाही. या सिझनमध्ये टॉप फाईवमध्ये पोहोचणाऱ्यांत तान्या मित्तल हिचादेखील समावेश होता. ग्रँड फिनालेमध्ये तिने केलेल्या एका विधानाची आता सगळीकडेच चर्चा होत आहे. तिने बिग बॉसचा होस्ट सलमान खानला थेट मी तुमच्या फ्लॅटवर राहायला येत आहे, असं सांगून टाकलं आहे. त्यानंतर सलमान खानने दिलेल्या उत्तराची मात्र सगळीकडे चर्चा होत आहे.
तान्या मित्तलने वेधून घेतले लक्ष
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेपर्यंत प्रणित मोरे, फरहाना भट्ट, गौरव खन्ना, तान्या मित्तल, अमाल मलिक या पाच स्पर्धकांनी मजल मारली होती. या संपूर्ण पर्वात तान्या मित्तल ही नेहमीच चर्चेत राहिली. सर्वाधिक बढाया मारणारी स्पर्धक म्हणून तिची ओळख निर्माण झाली होती. ग्रँड फिनालेच्या कार्यक्रमातही तान्या मित्तलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सलमान खानने तिची चांगलीच फिरकी घेतली. तर तान्यानेदेखील मी तुमच्या थेट फ्लॅटवर राहायला येणार आहे, असे सांगून सलमान खानचं काही काळासाठी टेन्शनच वाढवलं.
सलमान-तान्या यांच्यात काय संभाषण झाले?
ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने तान्या मित्तलची खूप प्रशंसा केली. बिग बॉसच्या घरात तू काहीही केलेलं असलं तरी बाहेर मात्र तुझी खूपच चर्चा आहे. तू खूप व्हायरल आहेस, असे सलमान खान तान्या मित्तलला उद्देशून म्हणाला. पुढे बोलताना तान्या तुझे घर तोडून टाकले आहे, हे तुला माहिती नाही का? असा मिश्किल सवाल केला. यावर उत्तर देताना, ‘आता बिग बॉसमधून बाहेर पडली की मी तुमच्याच घरात राहायला येणार आहे. इतर सर्व स्पर्धकांचे घर खूप छोटे आहे. माझे सामान खूप आहे. त्यांच्या घरात ते मावणार नाही. त्यामुळे मी तुमच्याच इथे राहायला येणार,’ असे तान्या हसत-हसत म्हणील. त्यावर सलमान खानने मात्र मी फक्त 1 BHK घरात राहतो. त्यामुळे तू माझ्या घरात राहू शकणार नाहीस, असे उत्तर देत तान्याला माझ्या घरात प्रवेश नसेल असेच अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. सलमान आणि तान्या यांच्या या संवादाची आता सगळीकडेच चर्चा होत आहे.
