
Bigg Boss 19: अभिनेता सलमान खान याला मिळत असलेल्या धमक्यांनंतर ‘बिग बॉस’ शोच्या निर्मात्यांनी अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी मोठे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जेव्हा विकेंडका वार एपिसोडचं शुट होतं, तेव्हा सेटवर लाईव्ह ऑडियन्स नसते… गेल्या सीझनमध्ये लाईव्ह ऑडियन्स म्हणजे शोचं सर्वकाही होतं… पण या सीझन दरम्यान सलमान खानच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. एंडेमोल शाइन इंडियाचे सीईओ ऋषी नेगी यांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, ऋषी नेगी यांनी सलमान खान याच्या सुरक्षेवर मौन सोडलं. ‘आमच्या कामाच्या ठिकाणी जवळपास 600 लोकं आहे. 3 शिफ्टमध्ये आम्ही 24X7 काम करतो. ऑफिस स्पेसमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. जेव्हा कंटेंट सुरक्षा आणि ऑन-ग्राउंड लॉजिस्टिकचा प्रश्न येतो. तेव्हा सर्वकाही योग्य रित्या पार पडेल याची काळजी आम्ही घेतो…’
‘गेल्या काही वर्षांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जेव्हा सलमान खान शोमध्ये असतो, तेव्हा लाईव्ह ऑडियन्स नसते. शिवाय शोमधील प्रत्येकाला नियमांचं पालन करण गरजेचं आहे… ज्या लोकांना कामासाठी ठेवलं आहे, त्या प्रत्येकाचा इतिहास तपासला जात आहे…’ असं देखील ऋषी नेही म्हणाले आहेत.
सलमान खान याच्या घरी गोळीबार…
सांगायचं झालं तर, गेल्या काही वर्षांत सलमान खान याला अनेकादा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एवढंच नाही तर, एप्रिल महिन्यात अभिनेत्याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार देखील करण्यात आली… अशात सरकार आणि स्वतः सलमान खान याने देखील स्वतःच्या सुरक्षेत वाढ केली.
सलमान खान याचे आगामी सिनेमे
सलमान खान याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘बिग बॉस 19’ शोमध्ये व्यस्त आहे. शिवाय अभिनेता ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा पुढच्या वर्षी मोठ्य पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सलमान खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. अभिनेता कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत…