Bigg Boss 19 : मराठी कार्ड खेळले बंद करा, प्रणित मोरे याला सपोर्ट करणे या मराठी अभिनेत्रीला पडले अत्यंत महागात, थेट…

Bigg Boss 19 Finale : बिग बॉस 19 च्या फिनालेला अवघे काही तास शिल्लक आहेत. जवळपास लोक आपल्या आवडत्या स्पर्धेकाला सपोर्ट करताना दिसत आहेत. मात्र, प्रणित मोरेसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे एका मराठी अभिनेत्रीला महागात पडलंय.

Bigg Boss 19 : मराठी कार्ड खेळले बंद करा, प्रणित मोरे याला सपोर्ट करणे या मराठी अभिनेत्रीला पडले अत्यंत महागात, थेट...
Pranit More
| Updated on: Dec 06, 2025 | 9:12 AM

बिग बॉस 19 चा ग्रॅंड फिनाले उद्या 7 डिसेंबर 2025 रोजी आहे. या फिनालेला काही काही तास शिल्लक असताना आपल्या आवडत्या स्पर्धेकाला सपोर्ट करताना चाहत्यांसोबत काही स्टार देखील दिसत आहेत. बिग बॉस 19 ला त्यांचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाले आहेत. फरहाना भट, अमाना मलिक, तान्या मित्तल, गौरव खन्ना आणि कॉमेडियन प्रणित मोरे हे बिग बॉस 19 चे टॉप 5 फायनलिस्ट ठरले आहेत. या पाच जणांपैकी एकाच्या गळ्यात बिग बॉस 19 च्या विजेत्याची माळ पडेल. भारतीय क्रिकेटर दीपक चहर याची बहीण मालती चहर टॉप 6 पर्यंत पोहोचली. मात्र, त्यानंतर तिला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. गाैरव खन्ना किंवा प्रणित मोरे यांच्यापैकी एकजण बिग बॉस 19 चा विजेता होईल, अशी जोरदार चर्चा आहे. आता नुकताच एका मराठी अभिनेत्रीला प्रणित मोरेचा सपोर्ट करणे अत्यंत महागात पडलंय.

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने बिग बॉस 19 च्या घरात असलेल्या प्रणित मोरे याला पाठिंबा दिला. मात्र, शिल्पा शिरोडकरने प्रणितला पाठिंबा देताच मोठा वाद निर्माण झाला असून शिल्पाला सतत सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिला जोरदार ट्रोल केले जात आहे. मराठी कार्ड खेळल्यावरून लोक तिला सुनावताना दिसत आहे. बिग बॉसच्या फिनालेला काही तास शिल्लक असतानाचा वाद पेटला.

शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, @Rj_pranit साठी फक्त एकच पर्याय आहे. मला प्रामाणिकपणे वाटते की त्यांने कधीही खोट्या मुखवटाने हत्या केली नाही. तो कायमच प्रामाणिक होता. म्हणून तो खरा हिरो वाटतो. शिल्पा शिरोडकने प्रणित मोरे याच्या समर्थनासाठी पोस्ट शेअर करताच थेट मोठा वाद पेटला.

शिल्पा शिरोडकरने पोस्ट शेअर करताच अनेकांनी म्हटले की, आली महाराष्ट्र मराठी कार्ड खेळायला. ट्रोल करत एकाने म्हटले की, ‘मराठी कार्ड’ नका वापरू… भाषा आणि प्रांतवाद बाजूला ठेवून प्रामाणिक व्यक्तीला सपोर्ट करणे आवश्यक आहे आणि आपण तेच केले पाहिजे, असे अनेकांनी म्हटले. सतत सोशल मीडियावर शिल्पा शिरोडकरला लोक सुनावताना दिसत आहेत.