Video: इथे काही चुकीचे घडले तर मला घरात घेणार नाहीत; तान्या मित्तलला अश्रू अनावर

Bigg Boss 19 Video: 'बिग बॉस 19' च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तान्या मित्तलचा एक वेगळा अवतार पाहायला मिळाला. एका क्लिपमध्ये मृदुल तिवारीने तान्या मित्तलला 'खोटी' म्हटले आणि तिच्या बॉयफ्रेंडलाही चर्चेत ओढले. यामुळे तान्या रडताना दिसली. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

Video: इथे काही चुकीचे घडले तर मला घरात घेणार नाहीत; तान्या मित्तलला अश्रू अनावर
Tanya Mittal
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 26, 2025 | 6:28 PM

‘बिग बॉस 19’ सध्या चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉसचा नुकताच प्रदर्शित झालेला एपिसोड भावनिक आणि नाट्यमय क्षणांनी भरलेला होता. बिग बॉसने घरातील सदस्यांना खास मूवी नाइटचे सरप्राइज दिले. स्पर्धकांचे खरे क्लिप्स दाखवण्यात आले आणि कॅप्टनसीच्या शर्यतीत सहभागी असलेल्यांना बजर दाबून प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली, जेणेकरून ते इतरांना शर्यतीतून बाहेर काढू शकतील. पहिल्या क्लिपमध्ये मृदुल तिवारी गौरव खन्नावर विश्वास ठेवताना दिसला. त्याने तान्या मित्तलला ‘खोटी’ म्हटले आणि तिच्या बॉयफ्रेंडलाही चर्चेत ओढले. अभिषेकने प्रथम बजर दाबला, बरोबर उत्तर दिले आणि कुनिकाला तात्काळ शर्यतीतून बाहेर काढले. दरम्यान, तान्या मित्तला फार वाईट वाटले. झीशानसोबत बोलत असताना तिला अश्रू अनावर झाले आहेत.

तान्या मित्तलला याचे खूप वाईट वाटले आणि तिने मृदुलला थेट सांगितले की, तिच्या खासगी आयुष्याला या खेळात ओढणे चुकीचे आहे. ती भावूक होऊन म्हणाली, “तुम्ही माझ्या बॉयफ्रेंडला ओळखतही नाही, कोणीतरी अनोळखी व्यक्ती तुम्हाला बिनबुडाच्या गोष्टी सांगत आहे. तुम्ही म्हणता की माझ्या बॉयफ्रेंडने मला ‘खोटी’ म्हटले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी नेहमीच मुलांपासून अंतर ठेवले आहे. जे माझ्या जवळ होते, त्यांनी मला कधीच खोटी म्हटले नाही. मी इथे अशा मुला-मुलींसोबत राहते जे शिवीगाळ करतात, पण मी मंदिरात जाते, मी आध्यात्मिक आहे. माझ्या व्हिडीओमध्येही तुम्हाला माझ्यासोबत कधीच कोणता मुलगा दिसणार नाही. मी फक्त झीशान जी आणि अमल यांचा हात धरते, ज्यांना मी माझा भाऊ आणि मित्र मानते.”

वाचा: तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेपण नवरात्रीमध्ये; न्यूड फोटोशूटमुळे मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

मृदुलने तान्याची मागितली माफी

नंतर मृदुलने तान्याची माफी मागितली, तर झीशान कादरीने वातावरण नॉर्मल करण्यासाठी मस्करीत म्हटले की, घराबाहेर पडताच तो तान्याचे लग्न लावून देईल. नंतर, तान्या झीशानशी तिच्या संघर्षांबद्दल बोलताना दिसली. ती रडत म्हणाली, “मी माझा स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. लोक म्हणतात, ‘खूप पुढे गेली आहे.’ घरी कोणी माझी साथ देत नाही. मी खूप प्रतिभावान आहे आणि मी सर्व काही स्वतःच्या मेहनतीने कमावले आहे. मी माझ्या आईची शपथ घेते, मी कधीच कोणत्याही मुलाशी बोलणार नाही. कारण मला त्यांची भीती वाटते. जर इथे काही चुकीचे घडले तर माझे कुटुंब मला घरात ठेवणार नाही. माझी साथ देणारा कोणीच नसेल.”

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

झीशानने तिला धीर दिला आणि तिला खचून जाऊ नकोस असा सल्ला दिला आहे. तसेच लोकांच्या अशा कमेंट्सचा जास्त परिणाम करुन घेऊ नकोस असा सल्लाही दिला. पण तान्याचा हा अवतार पाहून लोक फार मजा घेत आहेत. सगळे तान्याच्या या क्लिपवर कमेंट करत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, तिच्या रडण्याच्या स्टाईलमधूनच अभिनय दिसतो, तर काहीजण तिच्या रडण्याचीही टिंगल करत आहेत.

Follow Us