शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी तक्रार; वाचा काय-काय घडलं?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीची चर्चा आता अधिकच रंगू लागली आहे. पक्षातील काही महत्त्वाच्या निर्णयांवरून वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत पक्षाची सध्याची परिस्थिती, काही नेत्यांची कार्यपद्धती आणि संघटनात्मक बदल यावर चर्चा झाली. विशेषतः पार्थ पवार यांच्या निर्णयशैलीबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. जवळपास १५ ते २० मिनिटे ही चर्चा सुरू होती.
या बैठकीदरम्यान प्रफुल्ल पटेलच मुख्यतः शरद पवारांशी संवाद साधत होते, तर सुनील तटकरे यांना त्यावेळी काहीसे अस्वस्थ वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींना अधिक वेग आला आहे.
Published on: May 17, 2026 05:51 PM
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब