
टेलिव्हिजनवरील सर्वांत मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा 19 वा सिझन आजपासून (रविवार) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यंदाचा सिझन बऱ्याच अवधीनंतर सुरू होतेय. परंतु त्या हिशोबाने निर्मात्यांनी त्यात बरेच बदल केले आहेत. हा नविन सिझन अत्यंत खास बनवण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. ओटीटी आणि टीव्हीवर प्रसारित होणारा हा शो अनेक प्रकारे वेगळा असेल. परंतु नविन प्रयोग करणं आणि त्याला पहिल्यापेक्षा वेगळं बनवण्याचा प्रयत्न करणं निर्मात्यांना महागात पडू शकतो का, असा प्रश्न विचारला जात आहे.
सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’ या शोसंदर्भातील बातम्या देणाऱ्या ‘द खबरी’ या एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, ‘सर्वसामान्य लोकांचा हा सिझन असल्याचं दिसतंय. कारण स्पर्धक कोणतेच ओळखीचे दिसत नाहीयेत. हा आतापर्यंतचा सर्वांत फ्लॉप सिझन असेल.’ असा अंदाज वर्तवत या पोस्टमध्ये बिग बॉसच्या आतापर्यंतच्या हिट सिझन्सचा एक रिपोर्टसुद्धा दिला आहे.
बिग बॉस 4
बिग बॉस 7
बिग बॉस 11
बिग बॉस 13
बिग बॉस 16
बिग बॉस 3
बिग बॉस 5
बिग बॉस 6
बिग बॉस 8
बिग बॉस 10
बिग बॉस 14
बिग बॉस 17
बिग बॉस 1
बिग बॉस 2
बिग बॉस 18
बिग बॉस 9
बिग बॉस 12
बिग बॉस 15
Asli commoners season to #BiggBoss19 Lag raha
Pata ni kahan kahan se utha ke laaye hain yeh log😢
Most flop season ever loading…….
— The Khabri (@TheKhabriTweets) August 23, 2025
बिग बॉस 19 मध्ये यंदा सेलिब्रिटींपासून इन्फ्लुएन्सर्सपर्यंत अनेकांचा सहभाग असणार आहे. यामध्ये गौरव खन्ना, मृदुल तिवारी, अमाल मलिक, आवेज दरबार, तान्या मित्तल, अतुल किशन, कुनिका सदानंद, प्रणित मोरे, नीलम गिरी, जीशान कादरी, बसीर अली, नेहल चुजासमा, अभिषेक बजाज, नगमा मिराजकर, अशनूर कौर आणि नतालिया जानोसजेक यांचा समावेश असेल. परंतु यापैकी बरीच नावं आणि चेहरे प्रेक्षकांना माहीत नसल्याने हा सिझन फ्लॉप होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. बिग बॉस खबरीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी अशा स्पर्धकांची यादीच जोडली आहे, ज्यांनी सर्वसामान्य असून बिग बॉसचे सिझन्स गाजवले आहेत. मनू पंजाबी, मनवीर गुज्जर, असिम रियाज, अर्शी खान, सपना चौधरी, निक्की तांबोळी, शहनाज गिल यांनी बिग बॉस गाजवल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.