
Bigg Boss 19 : अभिनेता सलमान खान सध्या वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ या शोमुळे सर्वत्र तुफान चर्चेत आहे. सोशल मीडियावर शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता सोशल मीडियावर ‘बिग बॉस19’ शोचा विनर आणि TOP 5 फायनलिस्टची यादी सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त कोणता स्पर्धक विनर ठरेल आणि कोणाला अंतिम टप्प्यात घराबाहेर जावं लागेल… समोर आलं आहे.
‘बिग बॉस 19’ बद्दल दररोज चर्चा सुरू असतात आणि आम्ही या रिअॅलिटी शोबद्दलच्या रोज नवीन अपडेट्स तुमच्यासाठी सतत घेऊन येत आहोत. यात दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिग बॉस सीझन 19 स्क्रिप्टेड असल्याचा आरोप केला जात आहे.
यासोबतच, एक फोटो देखील शेअर केला जात आहे, ज्यामध्ये सर्व स्पर्धकांची, विजेत्यांची, सीझनच्या सर्व एव्हिक्शन स्पर्धकांची नावे जाहिर करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रणीत मोरे याने शो सोडल्याचं देखील सांगण्यात आलं आहे..
व्हायरल झालेल्या यादीवरून असं सूचित केलं जात आहे की, गौरव खन्ना हा बिग बॉस सीझन 19 चा विजेता असेल. टॉप पाच फायनलिस्टची नावे खालीलप्रमाणे आहेत:
गौरव खन्ना (विनर)
अभिषेक बजाज (रनर अप)
फरहाना भट्ट (सेकंड रनर अप)
अमाल मलिक (थर्ड रनर अप)
तान्या मित्तल (4th रनर अप)
याशिवाय अशनूर कौर 5th रनर अप असल्याचा दावा केला आहे. आता व्हायरल झालेल्या यादीमध्ये किती तथ्य आहे… हे येणाऱ्या काही दिवसांत समजेल. पण समोर आलेल्या यादीबद्दल ‘बिग बॉस 19’च्या निर्मात्यांनी कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही…
सलमान खानच्या बिग बॉस सीझन 19 चा भव्य प्रीमियर 24 ऑगस्ट रोजी झाला आणि 105 दिवसांनंतर शोच्या विजेत्याची घोषणा केली जाते आणि शो प्रेक्षकांचा निरोप घेतो… मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी होऊ शकतो. पण, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.