
बिग बॉस 19 ची प्रतिक्षा आता संपली आहे. शो सुरु झाला असून सलमान खानच्या अंदाजाने सर्वांची मने जिंकली आहेत. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून आलेल्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. तसेच या सीझनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. घरातील बरेच निर्णय सदस्यांच्या हाती सोपवण्यात आले आहेत.बिग बॉस फार हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगितलं आहे. स्पर्धकांना त्यांचे सर्व प्रश्न स्वतः सोडवावे लागणार आहेत. घरात लोकशाही असेल, म्हणजेच स्पर्धकच सर्वकाही ठरवणार आहेत.
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी या शोमध्ये एन्ट्री
या सीझनमध्ये मराठी कलाकारही दिसला आहे. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी या शोमध्ये एन्ट्री केली आहे. शोमध्ये प्रणित मोरे हा 11 वा स्पर्धक आहे. त्यामुळे आता बिग बॉस हिंदीमध्ये मराठी आवाजही आता पाहायला मिळणार आहे. जेव्हा प्रणित स्टेजवर आला तेव्हा सलमान खानने त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधला. तसेच प्रणितने सलमान खानसोबत मस्तीही केली. तेव्हा सलमान त्याला म्हणाला की, “मला वाटलंच होतं की माझ्यावर तू येणारच” त्यावेळी प्रणितने उत्तर दिलं की, ” नाही तुमच्यावर नाही येणार,नाहीतर मी उडेल” असं तो गंमतीने म्हणाला.
प्रणित सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तसेच त्याच्या विनोदामुळे वादही निर्माण झाला होता. त्यामुळे प्रणितला बिग बॉसच्या घरात पाहताना नक्कीच प्रेक्षकांना मजा येणार आहे.
Reels ki duniya se seedha reality ke ghar mein aa rahi hai @Rj_pranit 😍
Dekhiye #BiggBoss19 Grand Premiere, streaming now on #JioHotstar aur raat 10:30 baje @ColorsTV par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar #BB19JioHotstar pic.twitter.com/ut4y7ALhIq
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 24, 2025
सोशल मीडियावर खूप लोकप्रिय
प्रणित सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरही त्याचे सबस्क्राइबर्सची संख्या मोठी आहे. इंस्टाग्रामवर 2 हजारांहून अधिक पोस्ट करणाऱ्या प्रणितला इंस्टाग्रामवर 4 लाख 31 हजार नेटकरी फॉलो करतात. त्याचे इंस्टाग्राम अकाउंट त्याच्या कॉमेडी व्हिडिओंनी भरलेले आहे. तर युट्यूबवर त्याचे 10 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
या प्रकरणात प्रणितला मारहाण झाली होती
प्रणित मोरेने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर विनोद केले आहेत. पण, अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहाडियाची खिल्ली उडवणे प्रणितला चांगलेच महागात पडले होते. त्याच्या एका शो दरम्यान त्याने वीरवर काही विनोद केले. शो संपल्यानंतर काही जणांनी याबद्दल प्रणितला मारहाण केली होती. या प्रकरणात वीरने सांगितले की त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. तसेच अभिनेत्याने प्रणितची माफीही देखील मागितली होती.