Bigg Boss फेम स्पर्धकासह 3 जणांना अटक, त्याने मेहुण्यासोबत…, धक्कादायक प्रकरण समोर
Bigg Boss : 'बिग बॉस' फेम स्पर्धकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्याला पोलिसांना अटक केली आहे. त्याच्यासोबत पोलिसांनी अन्य तिघांना देखील ताब्यात घेतलं असून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तर जाणून घ्या स्पर्धकाने मेहुण्यासोबत नेमकं काय केलं आहे.

Bigg Boss : ‘बिग बॉस’ फेम स्पर्धक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील एका ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ‘बिग बॉस’ फेम यूट्यूबर अनुराग डोभाल उर्फ UK07 Rider याला पोलिसांनी डेहराडून येथून अटक केली आहे. मारहाणी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, पोलिसांनी अनुराग याच्यासह अन्य 3 लोकांना देखील अटक केली आहे. अनुराग याच्यावर मारहाणीचे आरोप असून पोलिस स्थानकात देखील पीडित पक्षाला मारहाण केल्याचे आरार आहे. सांगायचं झालं तर, अनुराग कायम त्याच्या बेधडक वक्तव्य आणि त्याच्या व्हिडीओमुळे कायम चर्चे असते. आता अनुराग याच्यावर आरोप आहेत की, त्याने मेहुणा राज सिंह चौहाण याला मारहाण केली आहे. आता या प्रकरणी अनुराग याच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या अन्य लोकांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना डेहराडून येथील हरिद्वार बायपास रोड जवळ सोमवारी रात्री घडली आहे.
बायकोच्या भावाला मारहाण…
रिपोर्टनुसार, अनुराग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. अनुराग डोभाल याने चुलत मेहुणा राज सिंह चौहाण याच्यावर मित्रांच्या मदतीने हल्ला करण्याची योजना तयार केली. एवढंच नाही तर, असं देखील सांगितलं दात होतं की, अभिनेत्याने मेहुण्याला जिवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. राज सिंह यांच्या सांगण्यावरुण पोलिसांना नेहरु कॉलनी पोलिसांत अनुराग आणि अन्य तीन कथित आरोपींना अटक केली आहे.
नेहरु कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्य रात्री कंट्रोल रुमच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली की, काही तरुणांची आपसात मारहाण सुरु आहे. अशात पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेव्हा अनुराग आणि त्याचे मित्र यांती राज सिंह आणि त्याच्या मित्रांसोबत मारहाण सुरु होती. त्यानंतर दोन्ही बाजूंची बाजू समजून घेत पोलिसांना त्यांना पोलीस स्थानकात आणलं. पण पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर देखील त्यांच्यात मारहाण सुरु होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतता राखण्यासाठी त्या वेळी चौघांनाही खूप समजावून सांगण्यात आले, पण आरोप आहे की, ते अधिक आक्रमक झाले आणि पुन्हा मारहाणीचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर चौकीबाहेर गर्दी जमली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. परिसरातील सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं.